Animal Care : पावसाळ्यात शेळ्यांचे व्यवस्थापन कसे करावे

दमट वातावरण आणि ओलाव्यामुळे शेळ्यांना आजार होण्याची दाट शक्यता असते.आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
पावसाळ्यातील शेळ्यांचे व्यवस्थापन कसे करावे –
१)आद्रता कमी ठेवण्यासाठी गोठ्यात रात्रीच्या वेळी ६० वॉटचा विजेचा बल्ब लावावा.
२) पावसाळ्यात गोठ्याच्या दाराजवळ चुना टाकावा.
३)शेडमधील जमिनीवर ही चुना टाकल्याने शेळ्यांना आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होते.
४) दररोज गोठा कोरडा व स्वच्छता ठेवावा.
५) पावसाळ्यामध्ये माशांच्या नियंत्रणासाठी कडुनिंब, निरगुडी किंवा करंज पाला यांचा वापर करून गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे.

६) गोठा ओला असल्याने खुरामध्ये ओलसरपणा राहून पायाला फोड येतात व शेळ्या लंगडतात तसेच ताप येतो त्यामुळे गोठा कोरडा ठेवावा.
७) शेळ्यांना त्यांच्या वजनानुसार जंतनाशक शिफारशीत प्रमाणात देऊन जंतनिर्मूलन करून घ्यावे.तसेच संतुलित खुराक दिल्यास पावसाळ्यात त्यांची प्रतिकार शक्ती उत्तम राहील.
८) पावसाळ्यात शेळ्यांना धनुर्वात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे लसीकरण करावे.
९) पावसाळ्याच्या दिवसात शेळी खरेदी करणे टाळावे. कारण पावसाळ्यात आजार संक्रमण होण्याची शक्यता असते.
१०)पावसात जास्त वेळ शेळ्या भिजू देऊ नये कारण न्यूमोनियासारखा आजार होतो.यामुळे शेळी शिंकते, नाकातून चिकट हिरवा/पिवळसर द्रव वाहतो, ताप येतो व धाप लागते.
११)पावसाळ्यात शेळ्यांसाठी कोरडा चारा आणि इतर खाद्याची साठवण योग्य ठिकाणी करावी.
१२)कोवळ्या चाऱ्यात तंतुमय पदार्थ कमी असल्याने असा चारा जास्त खाऊ घातल्यास त्यांना अपचन होण्याची शक्यता जास्त असते.
१३)शेळ्यांना पावसाळ्यात चारा कुट्टी करून खायला द्यावा व पाणी स्वच्छ द्यावे.
सौजन्य – ॲग्रोवन