मधुमेह (डायबिटीज) म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे,आहार आणि उपचार..

0

मधुमेह एक असा आजार आहे ज्यात रक्तामध्ये साखरेचा स्तर नियंत्रित राहत नाही.खराब जीवनशैली, व्यस्त दिनचर्या ,असमतोल आहार, धूम्रपान तसेच वाढता ताणतणाव यामुळे आजकाल अनेक लोकांमध्ये वेगवेगळे आजार होण्याचा धोका वाढला आहे. तसेच झोप आणि आहार देखील शरीरासाठी फार महत्वाचा ठरतो.

कसा होतो मधुमेह (Diabetes) ?

आपल्या शरीरात पेंक्रीयाझ नावाची एक ग्रंथी असते. यातून इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार होत असते. हेच इन्सुलिन आपली शरीरातील रक्तात तयार होणाऱ्या ग्लुकोज वा साखरेची मात्रा नियंत्रित ठेवण्याचे काम करते. पण शारीरिक बदलासह पेंक्रीयाझ इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि साखरेचा स्तर वाढत जातो. शेवटी तो मनुष्य मधुमेहाला बळी पडतो.

रक्तात ग्लुकोजची मात्रा वाढल्याने रक्तात उपस्थित घटकांचे संतुलन बिघडते. जसे कि रक्तात पांढऱ्या रक्त पेशी (WBC) आणि लाल रक्त पेशी (RBC) असतात.जेव्हा रक्तात ग्लुकोजचा स्तर वाढत जातो तेव्हा लाल रक्त पेशी ज्या जखमेला लवकर भरण्याचे काम करतात. त्या ग्लुकोजची मात्रा वाढल्याने आपले काम नीट पार पडू शकत नाहीत. पांढऱ्या पेशी ज्या आपल्या शरीराला रोगप्रतिकार शक्ती प्रदान करतात त्यांचा प्रभाव सुद्धा अतिग्लुकोजमुळे कमी होतो. यामुळे मधुमेहासोबत इतरही आजार आणि व्याधी शरीराभोवती विळखा घालू लागतात.

मधुमेहाचे लक्षणे :

रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे मधुमेह होतो. अशा परिस्थितीत सतत लघवी लागणे, जास्त भूक लागणे, घाम येणे, बेचैन वाटणे अशी अनेक लक्षणे दिसू शकतात. मधुमेह हा गंभीर हृदयरोगासाठीही कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे सुरुवातीच्या स्टेजलाच मधुमेहाला आळा घालता आला, तर आपले शरीर अनेक आजारांपासून वाचू शकते.अतिलठ्ठ व्यक्तींमध्ये हा आजार बळावण्याची आणि वाढण्याची शक्यता अधिक असते.

रक्तातील साखरेचे प्रमाण उपचारांमुळे अचानक कमी झाले तर पेशींचे कामकाज मंदावून ग्लानी (चक्कर) येते. खूप डोके दुखणे, छातीत धडधड, घाम, भीती, थरथर, मळमळ, खूप भूक, थकवा, चक्कर, डोळ्यापुढे अंधारी, गोंधळलेली मानसिक अवस्था, कधीकधी झटके आणि बेशुध्दी, इत्यादी परिणाम साखरेचे प्रमाण उतरल्याने होतात.

मधुमेहावर उपचार काय आहेत ?

हलका व्यायाम व योगासने करावी तसेच साधा आहार,जेवणात मिठाचे प्रमाण कमी असावे.पालेभाज्यांचा समावेश आपल्या आहारात करावा तसेच भरपूर चालावे.मधुमेही रुग्णांनी दररोज ४० मिनिटे हालचाल (चालणे, सायकल चालवणे, कार्डिओ आणि योग) आणि २० मिनिटे दीर्घ श्वास घेणे (प्राणायाम) करणे अनिवार्य आहेत्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत राहून शरीरातील प्रत्येक पेशीला पुरेसा ऑक्सिजन, लिव्हर डिटॉक्स होणे आणि इन्सुलिनचा योग्य स्राव होण्यास मदत होते.

मधुमेह घरच्या घरी नियंत्रित करण्यासाठी उपाय :

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी फ्लेक्ससीड रामबाण उपाय मानला जाऊ शकतात. हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, फ्लेक्ससीडमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यांचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

कांद्यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

कोरफडीचा रस प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते तसेच मेथी दाण्यांचे सेवन केल्यानेही मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »