रक्तदाब (Blood pressure) म्हणजे काय; कारणे, लक्षणे व उपाचार..
रक्तदाब (Blood pressure) म्हणजे काय?
शरीरातील साखर आणि ग्लुकोज या दोन गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या शरीराला उर्जा देण्याचे काम करतात.हे आपल्या शरीराचे इंधन आहे.परंतु यांची मात्रा अधिक वाढल्याने इन्सुलिनची निर्मिती कमी होत जाते. त्यामुळे एकाच ठिकाणी हि साखर व ग्लुकोज अडकून राहते व शरीरात असूनही त्याचा शरीरासाठी काही उपयोग होत नाही.जेव्हा शरीरात ग्लुकोज व साखरेची मात्रा वाढू लागते तेव्हा हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु होतो. हे यामुळे होते कारण रक्तात ग्लुकोज वाढल्याने रक्त गढूळ होते आणि ह्या दुषित रक्ताचा प्रवाह संथ होऊन हे रक्त वेळेत हृदयापर्यंत पोहोचत नाही. ते रक्त पोहोचावे म्हणून शरीर जोर लावते. यालाच उच्च रक्तदाब त्यामुळे शरीरात उर्जेची कमतरता भासते व हि उर्जा भरून काढण्यासाठी शरीर तुमची भूक वाढवते.तर मंडळी हि काही लक्षणे आहेत जी दिसू लागल्यास तुम्ही तत्काळ मधुमेहाचे उपचार सुरु करणे आवश्यक आहे.
नॅशनल हेल्थ सर्व्हिस नुसार, या लोकांना उच्च रक्तदाबाचा धोका अधिक असतो .
– ज्यांचे वजन अधिक असते,जे जास्त मीठ खातात.
– जे खूप जास्त मद्यपान करतात अथवा खूप कॉफी पितात.
– जे पुरेशी झोप घेत नाहीत.
– ज्यांचे वय ६५ पेक्षा अधिक आहे.
लक्षणे :
हातापायांवर सूज येत असेल तर हे उच्च रक्तदाबाचे लक्षणंही असू शकते,उच्च रक्तदाबाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये डोळ्यांनी कमी किंवा अंधूक दिसते.चक्कर येणे, आसपासच्या वस्तू हलत असल्याचा भास होणे, छातीत धडधड होणे, छातीत दुखणे, कामात लक्ष केंद्रित न होणे, एकाग्रता न होणे, आकडेमोड चुकणे, घटनाक्रम विसरणे, थकवा जाणवणे, चिडचिड करणे, आदी लक्षणेही दिसू लागतात.
उच्च रक्तदाबावर उपचार व उपाय:
जर उच्च रक्तदाबावर काहीही उपाययोजना केली नाही तर वयाची २० वर्षे कमी झाली आहेत, असे समजावे. उच्च रक्तदाबामुळे हृदयाचा झटका किंवा आघात होण्याचे प्रमाण ३ पटींनी वाढते, हृदयक्रिया निकामी होणे, रक्तवाहिन्यांतील दोष, दृष्टी कमजोर होणे, मूत्रपिंड निकामी होणे, लकवा किंवा मेंदूत रक्तस्राव होणे हा धोका सरासरी ३ ते ४ पटींनी वाढतो.उच्च रक्तदाबाचा त्रास असाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यासही उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होऊ शकतो.
नियमित रक्तदाबाची तपासणी आवश्यक आहे, आहारात बदल व वजन कमी करणे, मीठ, साखर, चरबीयुक्त पदार्थ कमी खावेत. वजन कमी करणे, भरपूर फळभाज्या, शाकाहार घेणे, जीवनात नियमितता, संतुलित आहार घ्यावा, आहारात फळे आणि भाज्यांच्या समावेश करावा. पुरेसा व्यायाम करावा.योग्य औषधोपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने चालू ठेवावा.