राम लल्लाचा प्राण प्रतिष्ठा होताच पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, एक कोटी लोकांना दिली ‘भेट’..!
Pradhan Mantri Suryoday Yojana: आज अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या हाताने राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाची स्थापना केली.अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठापनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या सौर योजनेची घोषणा केली आहे.दिल्लीत परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी योजना सुरू केली.
या योजनेंतर्गत देशातील १ कोटी घरांच्या छतावर सोलर रूफ टॉप सिस्टीम बसवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, ‘आज, अयोध्येतील अभिषेकच्या शुभ मुहूर्तावर, भारतीयांच्या घराच्या छतावर स्वत:ची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी हा माझा संकल्प आणखी दृढ झाला. पीएम मोदींच्या घोषणेनुसार या योजनेंतर्गत एक कोटी घरांमध्ये रुफटॉप सोलर बसवण्यात येणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईलया योजनेची माहिती पंतप्रधानांनी ट्विटरवर शेअर केली आहे. सूर्यवंशी भगवान श्री रामाच्या प्रकाशातून जगातील सर्व भक्तांना नेहमीच ऊर्जा मिळते असे त्यांनी पोस्ट केले आहे.