उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावर करा घरच्या घरी हे उपाय…

0

उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे आणि त्याचबरोबर जळजळ, मुत्रानालीकेत दाह व काहीवेळा रक्त जाणे. हा त्रास मुख्यत्वे उन्हाळ्यात उद्भवतो. अशावेळी लघवी गढूळ होते किंवा रक्तामुळे ती लालसर तपकिरी असते.सोप्या भाषेत उन्हाळी लागणे म्हणजे लघवी करताना मूत्रमार्गाला दाह जाणवतो.तर मूत्रमार्गात इनफेक्शन झाल्यामुळेही उन्हाळी लागते. जर उन्हाळी तीव्र झाल्यास लघवीच्या जागी तीव्र वेदना होतात आणि जळजळ होते. कधी कधी प्रायव्हेट पार्टवर पुरळ अथवा लाल चट्टे पडतात.

उन्हाळी लागण्याची करणे
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कामी होतं. पाणी कमी झाल्याने लघवीत क्षारचं प्रमाण वाढतं. म्हणजेच शरीरात पाणी नसल्याने ‘उन्हाळी लागते’. स्त्री आणि पुरुषांमध्ये हा त्रास वेगवेगळ्या प्रकारे असतो.पुरुषांमध्ये  लघवीला व मुत्रानालीकेत आणि जळजळ व आग होण्यासारखी लक्षणे दिसतात तर स्त्रियांमध्ये हीच लक्षणे काही प्रमाणात तीव्र असतात. स्त्रियांना लघवीला जळजळ होण्याबरोबरच कळ येणे आणि रक्तस्त्रावाचा त्रास होतो. यापासून लहान मुलंही वाचलेली नाहीत.कधी औषधांच्या अतिसेवनानेदेखील उन्हाळी लागते.


यावर घरघुती उपाय आहेत.
१. पहिला आणि मुख्य उपाय म्हणजे ‘भरपूर पाणी प्या.’शरीरात ओलावा टिकून राहण्यासाठी दिवसभरात १०-१२ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.पाण्यात तुम्ही सब्जा बी देखील घालून पिऊ शकता.
२. खाण्याचा सोडा आणि लिंबू पाण्यात मिसळून प्यायल्यास त्रास कमी होतो.
३. शहाळ्याचे पाणी प्या.
४. धने, जिरे, बडीशेप भिजवून, कुस्करून त्यांना पाण्यात मिसळा व त्यात खडीसाखर घालून प्यावे.
५. कलिंगडचा रस प्या.जिरे, धनेपूड, कोथिंबीर घालून ताक प्यावे. ताक हे शरीरातीलविषारी पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढते.ताकामधून कॅल्शियम, फॉस्फरस व लॅक्टोबॅसिलस मिळते.
६. नारळाच्या पाण्यात धने व गूळ घालून प्या.
७. नीरा प्यायलाने देखील फायदा होतो.
८. आमसुलाचे पाणी, कोकम सरबत साखर घालून प्यावे.
९. कैरीचे पन्हे वेलदोडा घालून प्यावे.
१०.पुदिन्याचे पाणी प्या
११ रोज दोन विलायच्या खाव्यात..
१२. चूना ओला करून. तो बेंबित भरा. लगेच आराम मिळतो.  लिंबू सरबत करून प्या.

१३.नाचणीची आंबील प्या. नाचणीमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न,
मॅग्नेशिअम, पोटॅशिअम फायबर, कार्बोहायड्रेड्स हे पोषक घटक मोठ्या प्रमाणात मिळतात. नाचणी आंबील प्यायल्याने अॅसिडीटी, गॅस होणे, जळजळ होणे, अपचन असे पोटासंबंधित आजार होत नाहीत.

१४.दह्यासोबत जिरं खावं. पण, जिऱ्याचं अतिसेवनही करू नये. जलजिरा हे उन्हाळ्यात तहान भागवतं. पचनक्रिया सुधारण्यासाठी जिरे पावड घालून ताक प्यावे.

१५.व्हिटॅमिन सी आहार घ्या व्हिटॅमिन सी युक्त आहार घ्या.उन्हाळ्यात व्हिटॅमिन सी युक्त आहार घ्यायला हवा. उन्हाळ्यात संत्री, लिंबू, पा मोसंबी, पेरू, किवी, आंबा खायला हवे.
  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »