पाठ-कंबर खूप दुखते? खा दूधापेक्षा जास्त कॅल्शियम देणारे ५ पदार्थ, हाडं पोलादी होतील-फिट व्हाल

0

शरीर चांगले आणि मजबूत ठेवण्यासाठी प्रोटीनप्रमाणे कॅल्शियमची आवश्यकता असते. कॅल्शियम एक असे मिनरल आहे जे हाडं आणि दातांना निरोगी ठेवते. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. कॅल्शियम हाडं आणि दातांना मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात. कॅल्शियम मांसपेशींना संकुचित करण्यासाठी आवश्यक असते

रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. कॅल्शियमच्या सेवननाने हाय बीपी कंट्रोल होण्यास मदत होते. अनेकांना दूधाची एलर्जी असते तर काहीजणांना दूध प्यायला जराही आवडत नाही, अशावेळी तुम्ही दुधापेक्षा अधिक कॅल्शियम देणारे पदार्थ आपल्या आहारात घेऊ शकता.

कॅल्शियमसाठी काय खायचं? (Foods For Calcium)

असं मानलं जातं की कॅल्शियम दूध, पनीर यांसारख्या पदार्थांमध्ये भरपूर असते. हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार दुग्धजन्य पदार्थांशिवाय इतर पदार्थांमध्येही भरपूर कॅल्शियम असते. जसं की भाज्या, ड्रायफ्रुट्स यात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते.

सुकं अंजिर

२ सुकलेल्या अंजीरमध्ये जवळपास ६५ मिलीग्राम कॅल्शिमयम असते. तुम्ही ओटमीलवरही सुके अंजिर घालू शकता किंवा स्मूदीमध्ये घालून खाऊ शकता. पनीरमध्ये किंवा पिज्जा टॉपिंग्समध्ये वापरले जाते.

प्लांट मिल्क

गाईचे दूध कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. बदाम, तांदूळ किंवा सोयापासून तयार केलेले पदार्थ फोर्टिफाईड केले जातात. जेणेकरून कॅल्शियमचा स्तर गाईच्या दूधाप्रमाणे असेल.

टोफू

आशियाई पदार्थांमध्ये टोफूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ४ औंस टोफूमध्ये ४३० मिलीग्राम कॅल्शियम असते. हे प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते.

बदाम

बदामाचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. एक कप बदामात १९० मिलीग्राम कॅल्शियम असते. 2 चमचे बदामाच्या बटरमध्ये १११ मिलीग्राम कॅल्शियम असते. हा प्रोटीनसचा तगडा स्त्रोत आहे. ओट्स, खीर किंवा दूधात घालून तुम्ही बदामाचे सेवन करू शकता.

चवळी

चवळीच्या पांढऱ्या बीयांमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण भरपूर असते. यात कॅलरीज खूप कमी असतात. याव्यतिरिक्त चवळी फायबर्स, प्रोटीन्स, कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. एक कप पांढऱ्या चवळीमध्ये जवळपास १९० मिलीग्राम कॅल्शियम असते. ज्यामुळे हाडं मजबूत राहतात. याशिवाय काजू, खजूर, पालक, दही या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास कॅल्शियमची कमतरता भरून काढता येते.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »