प्रहार शेतकरी संघटनेची पत्रकार परिषद. २ मार्च ला आंदोलनाचा इशारा

0

कैलास सोनवणे दिघवद वार्ताहर      ‌. .                        प्रहार शेतकरी संघटनेची पत्रकार परिषद.           

             सध्या कांदा भाव कोसळले असुन   भाववाढी साठी   विविध पक्ष   व संघटना आंदोलन व उपोषण  करण्यासाठी   सरसावले असुन नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे  कांदा धोरणाच्या संदर्भात    प्रहार संघाचे पहिले निवेदन देण्यात आले होते व येत्या दोन तारखेला आमरण उपोषणाचे आश्वासन दिले होते  परंतु  त्याचा काहीही परिणाम न झाल्याने  आज  नाशिक जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन   केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी   कांदा संदर्भात     बाहेरच्या देशात  कांदा देण्याचे धरसोडी केल्याने  आज महाराष्ट्रात व नाशिक जिल्ह्यात  कांद्याचे उत्पादन वाढल्याने ‌मातिमोल भावाने संपूर्ण देशात कांदा विकला जात आहे  त्या मुळे  नाशिक जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत  येत्या दोन तारखेला उपोषण ते कोणत्याही प्रकारचे होईल व सरकारला  जागे करून   शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी व  योग्य बाजारभाव मिळवण्यासाठी  शेतकऱ्यांना विविध पक्ष संघटना यांनी एकत्र येऊन शेतकरी या नात्याने आम्हाला सहकार्य करावे अशे आवाहन केले यावेळी प्रहार पक्ष निरीक्षक सुरेश तात्या उशीर  चांदवड तालुका अध्यक्ष रामा बोरशे   प्रहार जनशक्ती तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण   गणेश तिडके  कैलास पगार रेवन गांगुर्डे  राजाराम मापारी आदी कार्य करते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »