अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ यांचे चंदेरी यश

0

 अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ यांचे चंदेरी यश

काजीसांगवीः उत्तम आवारे नाशिकचे अर्जुन वीर तसेच आशियाई सुवर्ण पदक विजेते ओलंपियन दत्तू बबन भोकनळ यांनी दिनांक 20 फेब्रुवारी 2023 ते 26 फेब्रुवारी 2023 रोजी आर्मी रोईंग नोड पुणे येथे झालेल्या सीनियर नॅशनल रोइंग स्पर्धेमध्ये 500 मीटर सिंगल स्कल मध्ये रौप्य पदकाची कमाई केली.

दत्तू भोकनळ यांनी अंतिम फेरीमध्ये सर्विसेस कडून खेळणारा व २०२० चा ऑलिम्पिक खेळाडू अरविंद सिंग तसेच इंडियन नेव्ही कडून खेळणारा सतनाम सिंग यांना पराभूत केले.सतनाम सिंग हा दोन किलोमीटर मध्ये सुवर्णपदकाचा मानकरी आहे तसेच अरविंद सिंह 2020 चा ऑलम्पियन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »