काजी सांगवी विद्यालयात समाजदिन उत्साहात साजरा

0

काजी सांगवी विद्यालयात समाजदिन उत्साहात साजरा 

काजी सांगवी (उत्तम अवारे) – काजी सांगवी येथील जनता माध्यमिक व  उच्च माध्यमिक विद्यालयात मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस समाज दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.ध्वज पूजन  भागवत साळवे तर  शालेय समितीचे अध्यक्ष दिनकरराव ठाकरे यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण  करण्यात आले. कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे,कर्मवीर भाऊसाहेब हिरे,कर्मवीर डी आर भोसले, कर्मवीर गणपत दादा मोरे कर्मवीर डॉ.वसंतराव पवार, कर्मवीर विठ्ठलराव हांडे, कर्मवीर बाबूराव ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज ,माता सरस्वती आदींच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या

 हस्ते करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन पालन करून  मान्यवरांसह सर्वांनी मास्क परिधान केले होते .सॅनिटायझरचा वापर करण्यात आला.कर्मवीरांच्या जीवन व

कार्याचा परिचय विद्यार्थी पायल ठोंबरे, ओम ठाकरे तसेच जेष्ठ शिक्षक माणिक कुंभार्डे यांनी आपल्या भाषणात करून दिला. व्यासपीठावर सरपंच साहेबराव सोनवणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिल ठाकरे शालेय समितीचे सदस्य  गंगाधर ठाकरे ,  पुंजाराम ठाकरे,  मुक्ताबाई ठाकरे,  बाळकृष्ण ठाकरे,  नामदेवराव सोनवणे, भागवत सोनवणे , राजाराम पठाडे,प्राचार्य चित्तरंजन न्याहारकर,प्रभारी पर्यवेक्षिका मंदाकिनी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविकात  संस्थेचा व कर्मवीरांचा परिचय करून उपस्थितांचे स्वागत केले.  एसएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच एचएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी उज्वल यश मिळणाऱ्या पहिल्या 1 ते 5 क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नाम उल्लेख  करण्यात आला. सूत्रसंचालन सांस्कृतिक समितीचे प्रमुख राजेंद्र पाटील यांनी केले. यावेळी शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ ,संस्थेचे सभासद ,हितचिंतक  व देणगीदार उपस्थित होते.

फोटोतील मजकूर- जनता विद्यालय काजी सांगवी समाजदिनानिमित्त  समितीचे अध्यक्ष दिनकर राव ठाकरे, भागवत साळवे , प्राचार्य चित्तरंजन न्याहारकर आदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »