खरीप हंगामातील कांदा लागवड भाग

0

 रोपवाटिका व्यावस्थापन

निरोगी रोपवाटिका करून त्याची ला  गवड साधली म्हणजे निम्मी लढाई जिकली असा अर्थ होतो. रोपवाटिके साठी शेतातील उंच भागावरील जागेची हलकी ते मध्यम जमिनिची निवड करावी. एक हेक्टर लागवडीसाठी १०-१२ गुंठे क्षेत्र तसेच प्रती एकरी ४-५ किलो बियाणे  लागते. रोपवाटिके साठी गादी वाफा / रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करावा त्यासाठी १ मी रुंद, ३ मी लांब व १५ सेमी उंचीचे गादी वाफे तयार करावे. मिश्र खत (१०० ग्राम १५:१५:१५) व शेन खत (२० किलो) टाकावे. बीज प्रक्रिया करावी. उगवण पूर्व तननाशकाचा वापर करावा (स्टंप २ मिली/ली). नियमित व योग्य पाणी द्यावे. ४० -४५ दिवसात रोपे लागवडी योग्य होतात. खरीप हंगामाकरिता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बी टाकावे. सावली करिता 50 टक्के हिरवी नेट वापरावी. 

Ø  *पुनर्लागवड* 

 कांदे जमिनीच्या खाली २५ सेमी पर्यंत वाढतात. उत्तम निचरयाची हलकी ते मध्यम भारी जमिनीची निवड करावी. नांगरणी व वखरणी करून शेत ढेकुळमुक्त करून २० ते २५ टन कुजलेले शेन खत टाकवे. पुनर्लागवडी करिता

रुंद वरंबा व सरी पद्धतीच अवलंब करावा त्यासाठी ४-५ फुट रुंदीचे व  १२-१५ सेमी उंचीचे शेताच्या लांबी नुसार वरंबे तयार करून १५ x १० सेमी वर  लागवड करावी. ओलिताकरिता ठीम्बक किवा स्प्रिंकलर पद्धतीचा अवलंब करावा. रोपांच्या शेंड्याकडील १/३ भाग कापून टाकावा व लागवड पूर्वी रोपे शिफारशीत कीटकनाशक व बुरशीनाशकाच्या द्रावणात डुबउन लागवड करावी.

Source:

श्री. निवृत्ती बा. पाटील, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषि विज्ञान केंद्र, वाशिम, – ९९२१००८५७५     

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »