चुकून तणनाशक फवारले गेले? तर काळजी करू नका

1
*🌱☘चुकून तणनाशक फवारले गेले?काळजी करू नका☘🌱*
        
🙏🙏
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
खरीप 2019/20 ची सुरुवात होत आहे ,त्यामुळे फळझाड वर्गीय पीके आणि आपले मुख्य पीक म्हणजे *कापूस* या पिकांना कीटनाशकांच्या फवारण्या करण्यासाठी शेतकरी राजा सज्ज झाला आहे.
              मित्रांनो बरेच शेतकरी मजुरांचा टंचाईमुळे तणनाशकांचा अपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग करतांना दिसत आहेत ,तणनाशक पिकावर किंवा तनावर वर फवारणीसाठीचा पंप वेगळा असवा, तणनाशक फवारलेल्या पंपाने कीटकनाशक फवारू नये .तणनाशकांचे बरेच प्रकार अहेत पेरणीपूर्वी मारायची,  पीक उगवल्यानंतर मारायची, तसेंच आंतरप्रवाही आणि स्पर्षजन्य इ.
           मित्रांनो चुकून काही शेतकरी बंधूंच्या हातून पिकावर तणनाशकांचा वापर केला जातो अश्या वेळी संपूर्ण वर्षाची कमाई शून्य होण्याची शक्यता असते. माझ्या एका शेजारी शेतकऱ्याने मागच्या वर्षी 4 फूट उंचीचा कापसाला मागच्या वर्षीचे उरलेले तणनाशक किटनाशकात मिक्स करून फवारल्यामुळे 4 एकर कापूस उपटून फेकावा लागला होता ,शेतकऱ्याचे नाव आहे साहेबराव राजाराम धनगर रा.वर्डी ता.चोपडा जि. जळगाव.
      मित्रांनो आपल्या हातून पिकावर चुकून तणनाशक मारलेल्या पंपाद्वारे फवारणी केली गेली तर घाबरण्याचे कारण नाही, पण ते आपल्या लक्षात आले पाहीजे, आपल्याला समजले की तन नाशक फवारले गेले तर सर्व प्रथम एक काळजी घ्यावी त्या पिकावर कोणत्याही परिस्थितीत *पालाश* युक्त खतांची फवारणी करू नये , केल्यास तणनाशकांचा परिणाम पालाशमुळे 4/5 पटीने वाढतो व पूर्ण पिक जळून जाते. आपल्याकडून *आंतरप्रवाही* तणनाशक मारले गेले असल्यास त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2 पटीने अधिक होतो *स्पर्षजन्य* तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवाऱ्याने धुवून काढले तर चालते ,त्यामुळे आपण फवारलेल्या तणनाशकांची तीव्रता निश्चितच कमी होते.
           मित्रांनो चुकून तणनाशक फवारले गेल्यास त्यावर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे, *15 लिटर च्या पंपासाठी 75 ग्रॅम सेंद्रिय गूळ आणि 60 ग्रॅम डी ए पी* *( डायअमोनियम फॉस्फेट*  ची झाड ओले होईल अशी फवारणी करणे .
*टीप*- डी ए पी 2 तास भिजवून वस्त्रगाळ करून घेणे.
             गुळ आणि डी ए पी चे द्रावण बाधित पिकावर 7/7 तासाच्या अंतराने 4 वेळा फवारणी केल्यास 90/95% तणनाशकांचा झालेला परिणाम कमी होतो .
        *बाजारात बाधित पिकावर फवारणी करण्यासाठी कोणतेच औषध नाही याची नोंद घ्यावी*

1 thought on “चुकून तणनाशक फवारले गेले? तर काळजी करू नका

  1. वागी पीकावर चुकून गोल मारन्यात गेले आहे उपाय सागा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »