जमीण सजीव सुपीक कशी ठेवावी लेख

0


१ ) कोणत्याही पिकाच्या उत्पादन वाढीसाठी जमीन सजीव असण फार महत्वाच आहे . जमीन निर्जीव असेल तर किती पण खते वापरा येणार उत्पादन फारच कमी येते .

२ ) उन्हाळ्यात जमीणीची नांगरट करून चांगली तापु द्यावी . उन्हाळ्यात जमीन तापल्याने काही महत्वाच्या घटना घडतात . उन्हाची किरणे जमीणीतील ढेकळांना भेदुन आतपर्यंत जातात . त्यामुळे पुर्वी दिलेल्या खतापैकी जमीनीत घट्ट स्थीरावलेले अन्नघटकांचे बंदीस्त कण मोकळे होतात .जमीण तापल्यानंतर मातीतले अॅक्टीनोमायसेस्ट व इतर उपयुक्त जिवाणु तापले जातात . अशा तापलेल्या मातीवर वळवाचा पाऊस पडताच ते कार्यान्वीत होतात . व त्यावेळी त्या मातीचा सुगंध दरवळु लागतो . जमीणीत असणाऱ्या  अळ्या .ऊपद्रवी किंडी . कोष हे बाहेर येतात व मरतात . काही पक्षांचे भक्षक होतात .

३ ) पिकांचे फेर पालट करणे फार गरजेचे आहे .एकच पिकपद्धती मुळ अपेक्षीत उत्पादन तर निघत नाहीच पण जमीणीचे आरोग्य फार बिघडते . उदा . आपण रोज एकच भाजी खाऊ लागलो तर आपल्याला तिचा कंटाळा येवु लागतो . तसच पिकाच पण आहे . आपण बोलु शकतो पण जमीण आपल्याला सांगु शकत नाही . म्हणुन तिच आरोग्य व्यवस्थीत ठेवन हे आपल पहील कर्तव्य आहे .म्हणुन बेवड पिक घ्यावीत .ऊदा . कांदा . हरभरा . चवळी . भुईमुग . तुर . इं .

४ ) रासायनिक खतांचा शिफारशीपेक्षा ज्यास्त वापर अजीबात नको . आपणास रासायनिक व सेंद्रीय खतांचा समतोल वापर करायचा आहे . त्यामुळ जमीणीचे आरोग्य ठीक राहील व उत्पादन पण वाढेल .

५ ) संरक्षित पाणी आपली जमीन सजीव ठेवण्यात महत्वाचा रोल ठरू शकते . आज नदीपट्यामध्ये अती पाणी वापरामुळ जमीन नापीक होऊ लागल्या आहेत .ठीबक सिंचन . तुषार सिंचन .रेनगण सिंचन आदींचा सिंचनासाठी वापर आवश्वक आहे . वाफसा स्थिति मध्ये पिकाची वाढ फार चांगली होते . मुळ्याभोवती हवा खेळती राहते . त्यामुळ दिलेल अन्न फार उत्तमरित्या शोषल जात .

६ ) शेनखत . कोंबडखत . लेंडी खत . कारखाण्यातुन मिळणारे कंपोष्टखत . अखादय पेंडी. इं एकरी १ टन तरी वापरावे त्यामुळ जिवानुना अन्न मिळुन त्यांची वाढ होईल .

७ ) ताग . धैचा . ही हीरवळीची पिके जमीन सजिव ठेवु शकतात . हलकी .मध्यम .व काळी जमीण असेल तर ताग . व जमीण चोपन असेल तर धैचा पेरावा . बरेच शेतकरी ऊसात अंतरपिक ताग . धैचा घेतात . त्यामुळ उसाच्या फुटव्यावर फार विपरीत परिणाम होतो . त्यामुळ हिरवळीची पिके स्वतंत्र घ्यावीत .

           आता लक्षात आल असेल की जमीन सजीव असेल तरच आपण एकरी १०० टन सहज गाठु शकतो .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »