खरीप हंगाम सन 2018-2019 करिता 50 पैसे पेक्षा कमी पैसेवारी असल्याने शासनाकड़ून शासन निर्णय क्रमांक:-एससीवाय-2019/प्र क्र.19/म-7 दिनांक 25 जानेवारी 2019 प्रमाणे निविष्ठा अनुदान वाटप केले जाणार आहे.
येवला प्रतिनिधी:
१.खरीप हंगाम सन 2018-2019 करिता 50 पैसे पेक्षा कमी पैसेवारी असल्याने शासनाकड़ून शासन निर्णय क्रमांक:-एससीवाय-2019/प्र क्र.19/म-7 दिनांक 25 जानेवारी 2019 प्रमाणे निविष्ठा अनुदान वाटप केले जाणार आहे.
२.सदरचे रकमेतुन शेतीपिकांचे 33% किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याने बाधित झालेल्या सर्व बाधित शेतकऱ्यांना देय असलेल्या मदतीची रक्कम दोन हफत्यात प्रदान करण्यात येणार आहे. प्रथम हफ्ता म्हणून रु.6800/- प्रती हेक्टर या दराच्या 50% म्हणजेच रु.3400/- प्रती हेक्टर किंवा किमान रु.1000/- यापैकी अधिक असेल ती रक्कम शेतीपिकांचे बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रथमतः प्रदान करण्यात येणार आहे.
३.बहुवार्षिक पिकांचे 33% किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना प्रथम हफ्तयापोटी बहुवार्षिक पिकांसाठी अनुज्ञय असलेल्या रु.18000/-प्रती हेक्टरी या दराच्या 50% म्हणजेच रु.9000/- प्रती हेक्टरी किंवा किमान रु.2000/- यापैकी अधिक असेल ती रक्कम सर्व बाधित शेतकऱ्यांना प्रथमतः प्रदान करण्यात येणार आहे.
४. सदरची देण्यात येणारी मदत 2 हेक्टरच्या मर्यादेत व लागवड केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेपर्यंत राहील.तसेच मदतीचे वाटप सन 2018 मधील खरीप हंगामातील ७/१२ वरील पिकांच्या नोंदीच्या आधारे केले जाणार आहे.
५. मौजे ठाणगाव,पिंपरी व कानडी शिवारात शेतजमींन असलेल्या खातेदारांपैकी मयत झालेल्या खातेदारांच्या वारसांनी वारस नोंदीसाठी आवश्यक कागदपत्रे व अनुदानासाठी तहसील कार्यालयात नोंदवलेले लेखी संमतीपत्र तलाठी कार्यालय – ठाणगाव येथे तात्काळ जमा करावे.
६.सदर अनुदान रक्कम ही खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे.त्यामधुन कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसूली करू नये.त्यासाठी आवश्यक आपल्या राष्ट्रीयकृत बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स व आधारकार्डची झेरॉक्स तलाठी कार्यालय ठाणगाव येथे तात्काळ जमा करावी.
७.सदरची अनुदान रक्कम शेतीपिकांचे 33% किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याने बाधित झालेल्या सर्व बाधित शेतकऱ्यांना देय असलेल्या मदतीची रक्कम शासन निर्णयाप्रमाणे दोन हफ़्तयात प्रदान करण्यात येणार आहे.
८.सदरचे अनुदान हे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामधे थेट हस्तातंर पद्धतीने ( Direct Benefit Transfer ) प्रदान करण्यात येणार आहे.N.D.C.C बँकेच्या कुठल्याही शाखेच्या खात्यावर वर्ग केले जाणार नाहीत याची सर्व शेतकरी खातेदारांनी नोंद घ्यावी.
९. ज्या खातेदारांनी अद्याप कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघड़लेले नाही त्यांनी तात्काळ खाते उघडून बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स व आधारकार्डची झेरॉक्स तलाठी कार्यालय लाहित येथे तात्काळ जमा करावी.वेळेत कागदपत्र जमा न केल्यास अनुदान न मिळाल्यास त्यास संबंधीत खातेदार जबाबदार राहील.त्यास तलाठी कार्यालय ठाणगाव जबाबदार राहणार नाही.ह्याची सर्वानी नोंद घ्यावी.
१०. ज्या खातेदारांच्या नावे गांवी सामाईक शेतजमींन आहे अश्या शेतकरी खातेदारांनी ७/१२ उताऱ्यावरील सहधारकांचे तहसील कार्यालयात नोंदवलेले लेखी संमतीपत्र तलाठी कार्यालय ठाणगाव येथे जमा केल्याशिवाय अनुदान रक्कम संबंधितांच्या बँक खात्यावर पाठवले जाणार नाही.
११.आपण तलाठी कार्यालयात जमा केलेले राष्ट्रीयकृत बँक खात्याच्या पासबुकाची झेरॉक्स जमा केली आहे ते ख़ाते चालू आहे किंवा बंद आहे ह्याबाबत बँकेत जाऊन खात्री करावी.व बँकेच्या नियमानुसार आवश्यक रक्कम भरून खाते चालू करून घ्यावे.त्याबाबत संबंधित बँकेच्या शाखा व्यवस्थापक़ यांचेशी संपर्क करावा.किंवा नवीन खाते उघडून त्याची पहिल्या पानाची झेरॉक्स व आधारकार्डची झेरॉक्स तात्काळ तलाठी कार्यालयात जमा करावी.बंद खात्यावर अनुदान वर्ग होणार नाही.
१२. ज्या शेतकरी खातेदारांकड़े सन 2018- 2019 ह्या वर्षाची जमिनीची(जमीन महसूल) पट्टी,फळबागाची पट्टी ( शिक्षण कर ,वाढीव शिक्षण कर,रोजगार हमी कर )इत्यादी प्रकारची शासकीय येणे बाकी असल्यास संबंधितांनी सदरची रक्कम तात्काळ तलाठी कार्यालय ठाणगाव येथे तात्काळ भरणा करावी.