३१ डिसेंबरपर्यंत कांदा विकला असेल तर अनुदान मिळणार

0

 जानेवारी २३: काही दिवस आधी राज्य सरकारने १ नोव्हेंबर पासून १५ डिसेंबरपर्यंत विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. अर्ज भरण्याची प्रक्रिया २५ जानेवारी पर्यंत सुरु राहणार. पण ही मुदत आता आणखी पंधरा दिवसांनी म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

कांद्याचे दर घसरल्याने हे अनुदान देण्यात आले होते. यापूर्वीच या अनुदानासाठी अर्ज करण्याची मुदत २५ जानेवारीपर्यंत वाढवली होती. आता अनुदानाच्या लाभाची मुदतही ३१ डिसेंबरपर्यंत म्हणजे १५ दिवसांनी वाढवण्यात येणार आहे.

ज्या बाजार समितीकडे कांदा विक्री केला आहे त्याच्या पट्टीची मूळ प्रत, कांदा पीक पेरा नोंद असलेबाबतचा सात-बारा उतारा, बँक पासबुक झेरॅाक्स या कागदपत्रांसह संबंधित बाजार समितीकडे अनुदानासाठी २५ जानेवारी पर्यंत अर्ज करावा.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »