पपई एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

0

पपई एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
Source:
– श्री. विश्वजित कोकरे व श्री. ओमप्रकाश हिरे

👉भरपूर उत्पादन देणारे it बरेच वाण भारतात लागवडीकरिता उपलब्ध आहेत. त्यापैकी तैवान या पपईचे संकरीत वाणातील पपईची झाडे खताला उत्तम प्रतिसाद देतात. तैवान पपईचा कालावधी किमान १८ ते १९ महिने असून ते किमान ८ ते १० महिने फळ देत असते. त्यामुळे विक्रमी उत्पादनसाठी या वाणाला १ ते २ वेळा खत देण्याऐवजी खतांची मात्रा सतत देण आवश्यक असते. यामुळे  पपईला रासायनिक तसेच गावखते, सेंद्रिय खते, केव्हा व किती प्रमाणात द्यावीत याविषयी  जाणून घेऊ.

👉खत आणि पाणी व्यवस्थापनासाठी लागवडीअगोदर माती तसेच पाण्याचे परिक्षण करून घेणे आवश्यक असते. परिक्षणाच्या निकालावरून खत आणि पाण्याचे नियोजन करावे.

🅾 सेंद्रीय खते

👉पपई लागवड करावयाच्या क्षेत्रात शेणखत अथवा कंपोस्ट खत प्रति हेक्टरी 40 ते 50 बैलगाड्या (20 मे टन) जमिनीत मिसळून द्याव.

श्री. विश्वजित कोकरे व श्री. ओमप्रकाश हिरे

🅾 रासायनिक खते

👉पपई साठी २००:२००:२०० ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश ची आवश्यकता असते
हि खत मात्रा समान चार हपत्यामध्ये 1, 3, 5 आणि 7 महिन्यामध्ये  विभागून द्यावी.

🚫पहिला हप्ता लागवडी नंतर एक महिन्याच्या आत खालील पद्धतिने द्यावा.

👉 ५० ग्रॅम नत्र, ५० ग्रॅम स्फुरद आणि  ५० ग्रॅम पालाश म्हणजे अंदाजे 300 ग्रॅम SSP, 100 ग्रॅम युरिया व 80 ग्रॅम MOP प्रति झाड द्यावे.

🚫दुसरा हप्ता लागवडी नंतर तिसऱ्या महिन्यात खालील पद्धतिने द्यावा.

👉 ५० ग्रॅम नत्र, ५० ग्रॅम स्फुरद आणि  ५० ग्रॅम पालाश म्हणजे अंदाजे 100 ग्रॅम DAP, 50 ग्रॅम युरिया व 80 ग्रॅम MOP प्रति झाड द्यावे.

🚫तिसरा हप्ता लागवडी नंतर पाचव्या महिन्यात खालील पद्धतीने द्यावा.

👉 ५० ग्रॅम नत्र, ५० ग्रॅम स्फुरद आणि  ५० ग्रॅम पालाश म्हणजे अंदाजे 100 ग्रॅम DAP, 50 ग्रॅम युरिया व 80 ग्रॅम MOP प्रति झाड द्यावे.

श्री. विश्वजित कोकरे व श्री. ओमप्रकाश हिरे

🚫चौथा हप्ता लागवडी नंतर सातव्या महिण्यात खालील पद्धतिने द्यावा.

👉 ५० ग्रॅम नत्र, ५० ग्रॅम स्फुरद आणि  ५० ग्रॅम पालाश म्हणजे अंदाजे 100 ग्रॅम DAP, 50 ग्रॅम युरिया व 80 ग्रॅम MOP प्रति झाड द्यावे.

⭕वरील खतांची मात्रा विद्राव्य खतां मार्फत दिली तर चांगला परीणाम दिसून येतो.

⭕श्री विनायक शिंदे-पाटील (पीएच.डी-फळशास्ञ) यांच्याशिफारशीनुसार शेणकाला रबडी

🅾पपई साठी शेण काला रबडी

👉रबडी तयार करण्यासाठी १०० किलो शेण ४०० लिटर पाण्यात भिजत घालावे. 👉शेणाबरोबरच १० किलो फेरस सल्फेट, १० किलो झिंक सुल्फेट, १० किलो मेंग्नीसियम सल्फेट व १० किलो बोराक्स मिसळावे.
👉 हे मिश्रण काठीने हलवून चांगले एकजीवी करावे.
👉२४ तासंनातर पुन्हा ते काठीने हलवावे.
👉हि रबडी वापरताना यात पुन्हा ६०० लिटर पाणी मिसळून ते एकजीवी करून २४ तास ठेवून मग वापरावे.
👉या प्रक्रियेत सर्व सुक्ष्य अन्नद्रव्ये पाण्यात विरघळतात. हे मिश्रण दर झाडी एक लिटर दर महा किमान सात वेळा दिल्यास परिणाम दिसून येतो.
👉ठीबकाच्या खाली रेख पद्धतीचा वापर करून रबडी देण्यात यावी.
👉रासायनिक खतांची मात्रा दिल्यानंतर राबडीचा वापर करावा.
👉रबडी मिश्रण दिल्याने पाने गर्द हिरवी होतात; पिवळी दिसत नाहीत. झाडाची जोमदार वाढ होते तसेच  फळांची संख्या आणि फळांचे वजन वाढते. फळातील पोकळी कमी होऊन गर वाढतो.

श्री. विश्वजित कोकरे व श्री. ओमप्रकाश हिरे

🅾 जिवाणू स्लरी

👉जिवाणू स्लरी चा वापर पहिल्या महिन्यात व पाचव्या महिन्यात असा दोन वेळेस खालील पद्धतीने करावा.

👉20 kg शेणखत + 10 lit. गोमुत्र + 2 किलो काळा गूळ + 500 ग्राम ऍझोटोबॅक्टर + 500 ग्राम फॉस्फेट सोलुब्लिझिंग मिक्रोऑर्गॅनिझम ( PSB) + 500 ग्राम पोटॅश सोलुब्लिझिंग मिक्रोऑर्गॅनिझम (KSB) + 1 lit EM 2 द्रावण + 300 lit  पाणी.

⭕वरील स्लरी आधी 100 ते 150 lit पाण्यात बनवून 5 ते 6 दिवस सावलीत ठेवावी, दररोज 2 मिनिट हलवावी किंवा चांगली मिक्स करावी व 7 व्या दिवशी उरलेले पाणी त्यात टाकून वापश्यावर जमिनीत पिकास आळवणी म्हणजे ड्रिंचिंग करावी साधारणतः 1 lit प्रती झाड टाकावी.
Source::
👉अधिक माहिती साठी संपर्क –
श्री. विश्वजित कोकरे व श्री. ओमप्रकाश हिरे
पीएच. डी स्कॉलर,
मृद विज्ञान आणि कृषि रासायनशास्त्र
म.फु.कृ. वि. राहुरी
📞7588015491
     9975778487

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »