2017 मध्ये येणार ‘व्हीएसआय 08005
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
*2017 मध्ये येणार ‘व्हीएसआय 08005’*
उसाचे नवे वाण होणार उपलब्ध
– कमी पाण्यात जादा उत्पादन देण्याची क्षमता.
*या वाणात रसातील साखरेचे प्रमाण Recovery २०.७१ / टक्के आहे. खोडवा उत्पादन १४० टनापर्यंत मिळतो*
– ९ राज्यांमध्ये मिळाला प्रथम क्रमांक
– कर्नाटकात मिळाले हेक्टरी १७३ टन उत्पादन
पुणे (प्रतिनिधी) : तीन रोगांना प्रतिकारक आणि दुष्काळात पाण्याचा ताण सहन करत चांगले वाढणारे ‘व्हीएसआय ०८००५’ हे नवे वाण २०१७ मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
व्हीएसआय अर्थात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी नवीन वाणासाठी २००६ पासून चालविलेल्या चाचण्यांना यश आले आहे. राज्यात सध्या २० हजार एकरांवर या वाणाची चाचणी लागवड झाली आहे. अजूनही शेतकऱ्यांकडे विभागीय चाचण्या सुरू आहेत. पुढील वर्षी नांदेड, नगर व कोल्हापूर भागांतील साखर कारखान्यांमध्ये नवीन वाणाच्या उसाचे चाचणी गाळप होईल. व्हीएसआयच्या ऊस प्रजनन विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे यांनी सांगितले, की देशात ९ राज्यांमध्ये झालेल्या चाचण्यांमध्ये ‘व्हीएसआय ०८००५’ वाणाने पहिला क्रमांक मिळवला आहे.
तीनही विभागांत अव्वल
‘व्हीएसआय ०८००५’ वाण
राज्यातील विविध कृषी विद्यापीठे व व्हीएसआयच्या विभागीय चाचण्यांमध्ये तीनही विभागांत अव्वल ठरले आहे.
कांडी किणीस, काणी व तांबेरा, तसेच रेड रॉट ला हे वाण मध्यम प्रतिकारक वाण असल्याचे आढळून आले आहे.
विशेष म्हणजे कमी पाण्यात जादा उत्पादन व तुरा न येणारे हे वाण को ०३१० व को ८६०११ च्या संकरातून आले आहे.
त्यासाठी व्हीएसआयने अंबोली (सिंधुदुर्ग) येथील संशोधन केंद्रात विशेष चाचण्या घेतल्या आहेत.
– ऊस पीक शास्त्रज्ञांची कार्यशाळा
‘व्हीएसआय’मध्ये होणार…
ऊस पिकाच्या संशोधनात देशभर कार्यरत असलेली संशोधन केंद्रे व कृषी विद्यापीठांमधील ऊस शास्त्रज्ञांची यंदाची द्वैवार्षिक कार्यशाळा व्हीएसआयच्या मांजरी (जि. पुणे) येथील मुख्यालयात होत आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) उपमहासंचालक डॉ. जे. एस. संधू यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय समन्वयित ऊस संशोधन प्रकल्पाची ही कार्यशाळा होईल. कार्यशाळेत आयसीएआरचे अतिरिक्त महासंचालक डॉ. आर. के. सिंग, भारतीय ऊस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. डी. पाठक, कोइमतूरच्या ऊस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. राम बक्षी व इतर शास्त्रज्ञ सहभागी होत आहेत.
या कार्यशाळेत ऊस पिकांवरील विविध प्रयोगांचा आढावा घेतला जाईल. विभागवार शिफारशींनादेखील मान्यता दिली जाणार आहे,
अशी माहिती व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी दिली
अशी आहेत वाणाची वैशिष्ट्ये….
– या वाणाचा पक्वता कालावधी १२ ते १४ महिने असून, महाराष्ट्रात हेक्टरी १४४ टनांच्या पुढे उत्पादन मिळत आहे.
– कर्नाटकच्या संकेश्वर भागात या वाणाचे उत्पादन हेक्टरी १७३ टन, तर छत्तीसगडमध्ये १६३ टनांपर्यंत गेले आहे.
– इतर जातींपेक्षा या वाणाची उंची जादा मिळत आहे.
– हेक्टरी २१.९३ टन साखर उत्पादन देणारे हे वाण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
– आडसाली, सुरू, पूर्वहंगाम अशी बारमाही लागवडीची सुविधा शक्य.
– या वाणात रसातील साखरेचे प्रमाण Recovery २०.७१ / टक्के आहे. खोडवा उत्पादन १४० टनापर्यंत मिळतो.
संदर्भ ः सकाळ अँग्रोवन
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾