योग दिवस विशेष :काजीसांगवी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न
काजीसांगवीः (उत्तम आवारे) या चांदवड तालुक्यातील काजीसांगवी येथे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कै. नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने “आंतरराष्ट्रीय योग दिन” उत्साहाने साजरा केला.
मराठा विद्या प्रसारक समाजाचे कै. नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २१ जून २०२३ रोजी “आंतरराष्ट्रीय योग दिन” उत्साहाने साजरा केला. योग साधनेमध्ये विविध प्रकारच्या आसनांची प्रारंभिक हालचाली केली आणि योगासनांचे सुरुवातीला पुरक हालचाली केली. त्यामध्ये ताडासन, भुजंगासन, त्रिकोणासन, प्राणायाम, शवासन, शांती पाठ इत्यादी विविध आसने समाविष्ट करण्यात आली. योगासने आणि प्राणायामाचे मार्गदर्शन मा. वि. प्र सेवक संचालक आणि योग शिक्षक श्री जे एम निंबाळकर यांनी केले. सर्व कर्मचाऱ्यारी , शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्या आणि आंगणवाडी शिक्षिका ह्या सर्वांनी योगासने आणि प्राणायाम केले. मुख्याध्यापक श्री चित्तरंजन न्याहारकर यांनीआपल्या रोजच्या जीवनात योगा केल्याने प्रकारे शिक्षणासाठी व चांगले निरोगी आयुष्य जगण्यासाठी उपयोग होईल यावर मार्गदर्शन केले. तसेच विद्याथ्यांनी पण योगा योगाभ्यास यावर आपले मत मांडले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक श्री पाटील एस.पी., सर्व प्राध्यापक, आंगणवाडी शिक्षिका, शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्या यांनी प्रयत्न केले.