Bullock Castration : बैलांच्या खच्चीकरणावेळी द्यावी लागणार भूल

0

Bullock Castration : बैलांच्या खच्चीकरणावेळी द्यावी लागणार भूल

Animal care : वेदनांना बसणार लगाम; नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच अधिकार

Castration : सोलापूर : बैल, रेड्यांचे शेती कामात मन लागावे, स्वभाव क्रूर होऊ नये यासाठी विशिष्ट वयात आलेल्या बैल, रेड्याचे खच्चीकरण (Bullock Castration) करण्याची प्रथा आहे.

पारंपरिक वेदनादायी पद्धतीत बदल करून नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्याकडून भूल देऊन खच्चीकरण करावे, असे आदेश राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने काढले आहेत. ‘ॲनिमल राहत’ या सेवाभावी संस्थेने यासाठी २०१७ पासून पाठपुरावा केला होता.

बैल, रेड्याचे खच्चीकरण करणे ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब आहे. यासाठी शेतकरी पशुवैद्यकाकडून जनावरांचे खच्चीकरण करून घेतात. यासाठी अनधिकृत पशुवैद्यक, पशू पदविकाधारकांकडून अमानुषरीत्या, अघोरी पद्धतीने बैल, रेड्यास दोरीच्या साह्याने जमिनीवर पाडून त्यांचे चारही पाय बांधून खच्चीकरण केले जाते.

ही पद्धत अत्यंत वेदानादायी असल्याने बैल, रेड्यांना भयंकर यातना सोसाव्या लागतात. ही पद्धत बंद करून भूल देऊन खच्चीकरण करावे, यासाठी सांगली येथील ‘ॲनिमल राहत’ या संस्थेने शासनाकडे २०१७ पासून पाठपुरावा केला.

केंद्र सरकारने २० मार्च २०२३ रोजी प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध (पशुपालन प्रथा आणि पद्धती) नियम, २०२३ अधिसूचित केले आहे. त्यात नोंदणीकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत जनावरांना वेदनारहित खच्चीकरण करणे व इतर बाबी संदर्भात शासनाने स्पष्ट नियमावली दिली आहे. अवैध पद्धती अवलंबल्यास ‘प्राणी क्लेश प्रतिबंध कायदा’अंतर्गत शिक्षेच्या तरतुदी आहेत.

यासाठी ॲनिमल राहत आणि पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयाने पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांनी याची दखल घेत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना १२ मे रोजी आदेश दिले आहेत. यामुळे आता नव्या पद्धतीनेच खच्चीकरण करावे लागेल.

धन्यवाद

🙏🙏🙏

सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना नव्या पद्धतीचे प्रशिक्षण ॲनिमल राहतचे अधिकारी देत आहेत. यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन यादव, डॉ. आकाश यादव, डॉ. अनिकेत नावकर यांनी प्रयत्न केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »