काजी सांगवी मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवास जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन

0

काजी सांगवी मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवास जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन ………

   काजी सांगवी- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील कै.नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक चित्तरंजन न्याहारकर होते.. व्यासपीठावर  सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर , पर्यवेक्षक सुभाष पाटील जेष्ठ शिक्षक अर्जुन आहेर जेष्ठ शिक्षिका दर्शना न्याहारकर ,शोभा जाधव उपस्थित होते.

    कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयाचे  सांस्कृतिक प्रमुख समाधान कोल्हे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून ५ वी (अ) ची विद्यार्थिनी राणी कोल्हे हिने आपले मनोगत व्यक्त केले.

           अध्यक्षीय मनोगतात न्याहारकर सर म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदेतज्ञ,घटनाकार,अर्थशास्त्रज्ञ,तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक होते. त्यांनी सामाजिक क्रांतीच्या चळवळीला प्रेरणा दिली आणि महिलांच्या व कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांनी अनेक विषयांवर संशोधन व लिखाण केले आहे. त्यांची ग्रंथसंपदा व इतर लेखन विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्यांच्या लेखनात त्यांनी लिहिलेले ग्रंथ, पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात विविध विषयांवर हजारो दुर्मिळ ग्रंथांचा समावेश त्यांनी केलेला आहे. ते नेहमी म्हणायचे जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाचे पुस्तक घ्या व एक रुपयाची भाकरी घ्या भाकरी तुम्हाला जगवेल तर पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल हे त्यांचे विचार आजही दिशादर्शक आहे.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जेष्ठ शिक्षक माणिक कुंभार्डे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

      फोटो – काजीसांगवी येथील कै.नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक  हायस्कूल मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवास जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन करतांना विद्यालयाचे मुख्याध्यापक चित्तरंजन न्याहारकर,सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर,पर्यवेक्षक सुभाष पाटील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदी…………….

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »