Turmeric Arrival : रिसोड बाजार समितीत हळदीची विक्रमी आवक

0

Turmeric Arrival : रिसोड बाजार समितीत हळदीची विक्रमी आवक

Turmeric Market : येथील बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ८) हळदीची विक्रमी आवक झाली असून हळदीला साडेसहा हजारांपर्यंत दर मिळाला. हळदीची सुमारे १५ हजार क्विंटलची आवक झाली होती.
Washim News : येथील बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ८) हळदीची विक्रमी आवक झाली असून हळदीला साडेसहा हजारांपर्यंत दर मिळाला. हळदीची सुमारे १५ हजार क्विंटलची आवक झाली होती.
हमखास उत्पादन देणारे तसेच नगदी पीक म्हणून हळदीची या भागात ओळख निर्माण आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून तालुक्यात हळदीच्या लागवडीत लक्षणीय वाढ झाली आहे.
मागील काही वर्षांपासून सिंचनाच्या सुविधेत वाढ झाल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे हळद लागवड केली जाते. गेल्या दोन महिन्यांत ढगाळ वातावरण व पावसामुळे हळद काढणी व प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा त्रास झाला.
हळद तयार होताच खरीप हंगामासाठी तजविज म्हणून शेतकरी हळदीची विक्री करीत आहेत. यामुळे बाजारात आवक प्रचंड वाढली आहे. येथील बाजारात १५ हजार क्विंटलपर्यंत आवक झाल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली. येथील बाजार समितीत आठवड्यातून फक्त गुरुवारी हळदीचे सौदे केले जातात.
या बाजारात लोणार, मेहकर, मालेगाव व मराठवाड्यामधून हळद विक्रीला येत असल्यामुळे बाजार समितीमध्ये एकच गर्दी होत झाल्याचे गुरुवारी (ता. ८) दिसून आले. बाजार समितीच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान, चांगल्या प्रतिच्या हळद कांडीला साडेसहा हजार रुपयापर्यंत भाव मिळाला. वसमत व सांगली येथील बाजारापेक्षा येथील बाजार समितीत भाव कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »