World Water Day : लोक सहभागातून नदी प्रदूषणावर मात करणारा गोदावरी नदी संसंद उपक्रम

0

World Water Day : लोक सहभागातून नदी प्रदूषणावर मात करणारा गोदावरी नदी संसंद उपक्रम

संयुक्त राष्ट्र संघाने हे दशक ‘पर्यावरण पुनर्स्थापित दशक’ म्हणून घोषित केले आहे.पाणी,हवा,जमीन याचे प्रदूषण कमी करूनच पर्यावरण पुनर्स्थापित करणे शक्य आहे. त्यासाठी लोकसहभाग, जनजागृती महत्त्वाची आहे. यासाठी ‘गोदावरी नदी संसद’ हा उपक्रम सर्वांना मार्गदर्शक ठरणारा आहे.
दीपक मोरताळे
गाव शिवारातून वाहणारी नदी (River) ही आपली जीवनदायिनी, परंतु ही नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे विविध भागातील नदीची जैवविविधता धोक्यात आली आहे. गोदावरी नदीकिनारी नांदेड शहर वसले आहे.
या शहराची लोकसंख्या सुमारे सात लाख आहे. प्रत्येक व्यक्ती साधारण ४० ग्रॅम रासायनिक क्लिनर्स वापरते. यामध्ये प्रामुख्याने टूथ पेस्ट, साबण, हँड वॉश, डिटर्जंट, टॉयलेट क्लिनर्स,वॉशिंग पावडरचा रोज वापर होतो.
साधारणपणे दर वर्षाला नांदेड शहरातून १०,००० टनांपेक्षा अधिक रसायने गोदावरी नदीमध्ये सोडली जातात. यात आपण व्यावसायिक उद्योगांकडून होणारे प्रदूषण विचारात घेतलेले नाही.
दररोज विविध रसायने नदी पात्रात जात असल्यामुळे जलचर जिवंत राहू शकत नाहीत. त्याचा पर्यावरणावर घातक परिणाम होत आहे.
पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन
१) जलचरांना जिवंत राहण्यासाठी पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन लागतो.पावसातील पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण हे साधारण १० ते ११ पीपीएम असते.
नदीच्या पाण्यातील सर्वोत्तम गुणवत्ता असलेल्या पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण साधारण ८ ते १० पीपीएम असते.या पाण्यात जलचर उत्तम प्रकारे जगू शकतात.
२) जेव्हा आपण रसायन आणि सेंद्रिय घटक पाण्यात मिसळतो त्याची नैसर्गिकरित्या विघटन प्रक्रिया सुरू होते. या विघटन प्रक्रियेत पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
त्यामुळे पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी होत जाते. जेव्हा विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण चार पीपीएम पेक्षा कमी होते, तेव्हा जलचर पाण्यातील ऑक्सिजन अभावी मृत्युमुखी पडतात.
मृत्युमुखी पडलेल्या जलचरांच्या विघटन प्रक्रियेत ही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लागतो. या विघटन प्रक्रियेत पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण शून्य होते. पाण्याला प्रचंड दुर्गंधी येते.यात मोठ्या प्रमाणात जिवाणू, विषाणू वाढून रोगराई पसरत असते.
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »