मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ‘या’ दिवशी मिळणार! लवकरच खात्यात जमा होणार..

0

माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत फॉर्म भरणे १ जुलैपासून सुरू झाले आहे.त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरले जाणार आहेत. त्यानंतर सरकारकडून यादी जाहीर केली जाईल. योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातून सहा लाख १५ हजारांवर ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहे.ज्यांचे आधारलिंक बँक खाते असतील त्याच महिलांच्या बँक खात्यात राखीपौर्णिमेला म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी प्रत्येकी तीन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत.त्यानंतर पुढील टप्प्यात उर्वरित अर्जदार महिलांच्या खात्यातही रक्कम वर्ग केली जाणार आहे.ज्यांचे बँक खाते आधारलिंक नाहीत त्यांना बँकेत जाऊन खाते आधारलिंक करून घ्यावे लागणार आहे.

नारीशक्ती दूत’ ॲप बंद :

अर्जासाठी आता स्वतंत्र पोर्टल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर सुरवातीला ‘नारीशक्ती दूत’वर अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यावर सव्वादोन ते अडीच कोटी महिलांनी अर्ज केले.अर्ज करायला https://ladakibahin.maharashtra.gov.in ही नवीन वेबसाइट तयार करण्यात आली आहे.

बँक खात्याला आधारलिंक करणे जरूरी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील सहा लाख १५ हजार महिलांनी आतापर्यंत अर्ज केले असून त्यापैकी पाच लाख ९० हजार महिलांचे अर्ज अंतिम करून यादी शासनाला पाठविली आहे.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »