Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’चा हफ्ता अजूनही जमा झाला नाही तर काय कराल?

0

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलाय, पण पैसे आले नाही… काय असेल कारण जाणून घेऊयात..

लाडकी बहीण योजनेबाबत महिलांसाठी महत्त्वपूर्ण माहिती
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना आर्थिक सहाय्य मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनेक महिलांना तीन हजार रुपये जमा झाले असले तरी, काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पैसे जमा न झाल्यास काय करावे?

जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असून, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर खालील गोष्टींची तपासणी करा:

आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे का?
तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे सर्वप्रथम तपासा.
जर लिंक नसेल तर त्वरित लिंक करा. त्यानंतर जुलै महिन्यापासूनचे सर्व थकबाकीचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील.
मोबाइलवर आलेला मेसेज तपासा:
तुमच्या मोबाइलवर अर्जातील त्रुटीबाबत कोणताही मेसेज आला आहे का ते पहा.
जर मेसेज आला असेल तर त्या त्रुटीची पुर्तता करून अर्ज पुन्हा सबमिट करा.
दुसऱ्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का?
तुमचे आधार कार्ड दुसऱ्या बँक खात्याशी लिंक असल्यास पैसे त्या खात्यात जमा झाले असतील. त्यामुळे दुसऱ्या बँक खात्याचीही तपासणी करा.
महत्वाची सूचना:

लाडकी बहीण अ‍ॅप किंवा नारीशक्ती पोर्टलवरून तुमचा अर्ज मंजूर झाला आहे याची खात्री करा.हफ्ता अजूनही जमा झाला नसेल तर अजून तुमच्या अर्जाची तपासणी सुरु असेल, जर तुमच्या अर्जापुढे Pending, Disapproved किंवा review असे दिसत असेल तर अजूनही अर्जाची छाननी होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यानुसार 17 तारखेपर्यंत येणार होते पण अजूनही आले नसतील तर नंतरही येऊ शकता कारण अर्जाची पूर्ण तपासणी झाल्याशिवाय हे पैसे देणार नाहीत.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »