ST Bus|प्रवाशांच्या सेवेत येणार नव्या रुपातील ‘लालपरी’, पहिली झलक आली समोर!

0

व्यावसायिक वाहन निर्माता अशोक लेलंड कंपनीने दि. १५ जुलै २०२४ रोजी त्यांच्या अधिकृत सोशल हँडलद्वारे एसटीणे २१०४ बसेसची ऑर्डर दिल्याचे जाहीर केले आणि सर्वाना या बसेस नेमक्या कशा असतील याबद्दल कुतूहल निर्माण झाले.अशोक लेलॅंड कंपनीच्या ह्या गाड्यांची फाईल मागील एका वर्षांपासून मुख्यमंत्री कार्यालयात अडकली होती.  अशोक लेलँड लिमिटेडने सोमवारी सांगितले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून २,१०४ संपूर्णपणे तयार बससाठी ऑर्डर मिळाली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ही सर्वात मोठी संपूर्णपणे तयार बस ऑर्डर आहे आणि या ‘वाइकिंग’ प्रवासी बस अशोक लेलँडच्या विशेष बस बॉडी प्रकल्पांमध्ये तयार केल्या जातील, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

मात्र, कंपनीने ऑर्डरची आर्थिक माहिती उघड केलेली नाही.

अशोक लेलँडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शेनू अग्रवाल यांनी सांगितले की, नवीन ऑर्डर कंपनीच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाशी असलेल्या दीर्घकालीन भागीदारीचे प्रतीक आहे.

“ही नवीन ऑर्डर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आणि अत्यंत कार्यक्षम उत्पादने तयार करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते, ज्यामुळे देशातील सार्वजनिक वाहतुकीचा विकास होईल,” असे अग्रवाल यांनी सांगितले.एसटी महामंडळाच्या ताफ्यात ऑक्टोबर महिन्यात बसेस दाखल होणार असल्याची माहिती आहे. बसेससाठी 1012 कोटी रूपये राज्य सरकार खर्च करणार आहे.जुन्या बसेसची अवस्था अतिशय वाईट झाली होती. या सर्व बाबी लक्षात घेत एसटी महामंडळाने पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातनवीन बस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या रुपातील या एसटी बस अधिक आरामदायी आहेत. त्यामुळं नागरिकांचा प्रवास सुलभ होणार आहे.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »