Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार..’ तारखेला खात्यात जमा होणार २००० रुपये..

0

राज्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये लवकरच मिळणार आहेत.लाडकी बहीण योजेपाठोपाठ आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे. या योजेअंतर्गत आतापर्यंत ५ हजार ५१२ कोटी रुपये वितरीत केले आहेत.सरकारने लाडकी बहिण योजनेसोबतच इतर योजनांचा बार उडवून दिला होता. त्यामुळे नमो शेतकरी निधीच्या हप्त्याच्या वितरणाला पुढे ढकलण्यात आले होते. या योजनेच्या पुरवण्या मागण्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आल्या होत्या. फक्त इतर योजनांच्या अंमलबजावणीत वित्त विभागाने या योजनेच्या निधीला रोखून धरले होते. पण आता मात्र वित्त विभागाने चौथ्या हप्त्यासाठी मान्यता दिल्याची माहिती आहे.

पीएम किसानच्या १७ व्या हप्त्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला महासन्मान योजनेचा हप्ता देण्यात येणार आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या तिसरा हप्ता न मिळालेल्या शेतकऱ्यांना दोन हप्त्यांचा लाभ मिळणार आहे.

१ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या अकाउंटला दोन हजार रुपये जमा होणार आहे. सरकारने याबाबत आदेश दिले आहेत.राज्य सरकारने मंगळवारी याबाबत निर्णय दिला आहे. जून २०२३ मध्ये नमो शेतकरी योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या अकाउंटला प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये जमा होतात. या योजनेतून आतापर्यंत तीन हप्ते जमा करण्यात आले आहेत. या योजनेचा चौथा हप्ता पुढील दोन दिवसांमध्ये मिळण्याची शक्यता आहे.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »