तुरीचा दर वाढला, आजपर्यंतचा सर्वाधिक विक्रमी दर म्हणून नोंद, व्यापाऱ्यांचा फायदा

0

तुरीचा दर वाढला, आजपर्यंतचा सर्वाधिक विक्रमी दर म्हणून नोंद, व्यापाऱ्यांचा फायदा

कांद्याला दर मिळत नसल्याने धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. भाव नसल्याने त्याने आपला कांदा शेतात चाळीमध्ये साठवून ठेवला आहे.
यवतमाळ : यवतमाळ (yavatmal farmer news) जिल्ह्यातील खुल्या बाजारात तुरीला दहा हजार 115 रुपयांचा दर मिळत आहे. आजपर्यंतचा सर्वाधिक विक्रमी दर (Tur rates) म्हणून नोंद झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक लाख हेक्टरच्या वरती तुरीचा पेरा आहे. शेतकऱ्यांनी मार्चमध्ये तूर विक्रीस काढली होती. त्यावेळी सात हजार ते साडेआठ हजार रुपये क्विंटलचा दर होता. यानंतरच्या काळात दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना नसल्यामुळे शेतकऱ्यांनी (maharashtra agricultural news in marathi) पेरणीपूर्वी तूर बाजारात विक्रीला आणली. आता व्यापाऱ्यांकडे तूर शिल्लक राहिली आहे. सध्या तूरीला चांगला दर मिळाल्याने त्याचा व्यापाऱ्यांना चांगला फायदा होणार आहे.
बाजार समिती बंद असल्याने कांदा विक्री होत नाही
कांद्याला दर मिळत नसल्याने धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. भाव नसल्याने त्याने आपला कांदा शेतात चाळीमध्ये साठवून ठेवला आहे. शेतकऱ्यांना कांदा लागवड परवडत नाही. कांद्याला उत्पादित करण्यासाठी साधारण 13 रुपये प्रतिकिलो खर्च येतो. किमान पंधरा रुपये भाव भेटला पाहिजे. मात्र तसं होत नाही. गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झालंय. त्याचबरोबर आता पुन्हा कांद्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादकला दुहेरी आर्थिक मार बसत आहे. कांदा विकण्यासाठी गेल्यास बाजार समिती बंद आहे. बाजार समिती बंद असल्याने कांदा विक्री होत नाही. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. तोंडावर खरीप हंगाम आला असून, खरीपासाठी पैसे लागणार आहेत. मात्र कांदाच विक्री होत नाही, त्यासाठी तो कांदा चाळीमध्ये साठवणूक करून ठेवला आहे. साठवलेला कांदा उन्हामुळे खराब होतो आहे. त्यामुळे यावर सरकारने उपाययोजना करावी अशी अपेक्षा या भागातील शेतकरी व्यक्त करत आहेत.
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »