लाडक्या बहिणी’नंतर आता वयोश्री’ योजना; जाणून घ्या काय आहे नेमकी ही योजना …

0

ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार आहे. या योजनेचा लाभार्थी झाल्यास वर्षाला तीन हजार रूपये मिळणार आहे.ही योजना जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांमार्फत राबवली जाणार आहे.

जेष्ठ नागरिकांना या योजनेमार्फत ३ हजार रूपये मिळणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल.शासनामार्फत नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजने अंतर्गत 65 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत लाभार्थी आहेत यांना शासनाकडून अनुदानित स्वरूपात 3 हजार रुपयांची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी अर्जदाराकडे आधारकार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, राष्ट्रीयकृत बँकेतील खात्याची पासबूक झेरॉक्स, स्वयं घोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटवण्यासटी विहीत केलेली अन्य कागदपत्रे पुरावा म्हणून आवश्यक आहेत.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »