Governor Ramesh Bais : राज्यपाल बैस यांनी घेतली मराठीतून शपथ

0

Governor Ramesh Bais : राज्यपाल बैस यांनी घेतली मराठीतून शपथ

Mumbai News : भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची राज्यपालपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर नव नियुक्त राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais)यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी शनिवारी (ता. १८) पदाची शपथ दिली.
राजभवन येथे सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या शपथग्रहण कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित होते. राज्यपाल बैस यांनी या वेळी मराठीतून शपथ घेतली.
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवृत्तीची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना निवृत्त केले जाईल, असे बोलले जात होते.
तत्पूर्वी त्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
दरम्यान देशभरातील विविध राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्या केल्यानंतर त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश करत मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला. कोश्यारी यांच्या जागी रमेश बैस यांची नियुक्ती केली. बैस यांचे शुक्रवारी मुंबईत आगमन झाले. त्यानंतर शनिवारी त्यांचा शपथविधी पार पडला. बैस यांनी मराठीतून शपथ घेतली.
बैस हे १९७८ मध्ये पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. १९८० ते ८५ या कालावधीत ते मध्य प्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते.१९८९ मध्ये बैस हे रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर तब्बल सहा वेळा, म्हणजे एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. १९९८ मध्ये पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रमेश बैस यांची पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री होते.
१९९९ ते २००४ या कालावधीत त्यांनी रसायने व खते व त्यानंतर माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. २००३ मध्ये बैस यांना केंद्रीय खाण मंत्रालयामध्ये राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला व त्यानंतर काही काळ ते केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयात राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) होते. सध्या ते झारखंडचे राज्यपाल होते.
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »