दिघवद येथे आजपासून महाशिवरात्र उत्सव सुरू

0

दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे.    दिघवद ता चांदवड येथे  महाशिवरात्र उत्सव आज पासून शिवभक्त वै,  शंकरबाबा माळुंदे यांच्या कृपाशीर्वादाने व ह भ प नामदेव महाराज गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिवेणी कीर्तन महोत्सव गुरुवार १६/०२/३०२३ ते१९/०२/२०२३ या कालावधीत होणार आहे  विनापुजन हभप नामदेव महाराज गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले कलशपुजण हभपबाळासाहेब मापारी  अनिल मापारी हरीश गांगुर्डे यांनी केले तर ग्रंथ पुजण उत्तमराव झाल्टे यांनी प्रतिमा पूजन  ह.भ.प. पवण  कैलास सोनवणे यांनी केले ध्वज पुजण हभप सचिन पगार तुळशी पुजण गोविंद गांगुर्डे यांनी केले .

कार्यक्रमाची रूप रेषा:

रोज पहाटे पाच ते सात काकडा भजन सकाळी सात ते नऊ शिवलीला अमृत पारायण सायंकाळी सहा ते आठ हरिपाठ रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन 

गुरुवार 16/2/2023रोजी हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज कोकणे घोटी यांचे कीर्तन 

शुक्रवारी 17 2 रोजी हरिभक्त परायण उद्धव महाराज बिराजदार संगमनेर यांचे 

शनिवार 18/2/2023 रोजी हरिभक्त परायण गंगाधर महाराज कवडे शिऊर यांचे  कीर्तन होणार आहेत व रविवार 19/2/2023 दोन रोजी सकाळी नऊ ते अकरा हरिभक्त परायण संजय महाराज दुकळे सर मनमाड यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल यावेळी हरिभक्त परायण दौलत महाराज ठोंबरे हरिभक्त परायण भगीरथ महाराज टापरे हरिभक्त परायण भाऊलाल महाराज सावरगावकर साथ देतील मृदंगाचार्य हरिभक्त परायण अर्जुन महाराज गांगुर्डे हार्मोनियम लक्ष्मण महाराज गांगुर्डे हे साथ देतिल या कार्यक्रमाला दिगवत दहिवद बोपाने हिवरखेडे  पाटे कोलटेक उर्दुळ दरशवाडी  सांगवी  खडक ओझर  भोयेगाव आदी गावातील भजणी मंडळ उपस्थित राहणार आहेत या महापरवणीचा लाभ घ्यावा असे आवाहन पंचकमेटिचे बाळासाहेब मापारी नवनाथ झाल्टे हरीश गांगुर्डे अनिल मापारी सचिन पगार पवन सोनवणे व सिद्धेश्वर मंडळाने केले आहे

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »