जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे व् इतर माहिती

0

व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे :



१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट


७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!!


नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!!


जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!!
कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे.    

ग्रामपंचायत 
एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था. ग्रामपंचायत म्हणजेच राज्य शासनाचे विविध कार्य राबविणारे एक केंद्र, ग्रामस्थ आणि शासन ह्यांच्यामधी दुवा.

ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत येणारे विषय :

१. भूविकास
२. जमीन सुधारणांची अंमलबजावणी
३. जमिनीचे एकत्रीकरण
४. मृदुसंधारण
५. लघु पाट बंधारे
६. सामाजिक वनीकरण
७. घर बांधणी
८. खादी ग्रामोद्योग
९. कुटिरोद्योग
१०. रस्ते, नाले, पूल
११. पिण्याचे पाणी
१२. दळण वळणाची इतर साधने
१३. ग्रामीण विद्युतीकरण
१४. अपारंपरिक उर्जा साधने
१५. दारिद्रय निर्मुलन
१६. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण
१७. बाजार आणि जत्रा
१८. रुग्णालये आणि कुटुंब कल्याण
१९. महिला आणि बालविकास
२०. प्रौढ शिक्षण
२१. सांस्कृतिक कार्यक्रम
२२. सार्वजनिक वितरण
२३. उत्पादनाच्या बाबी

ग्रामपंचायतींची कार्ये:

१. कृषी – जमीन सुधारणा, धान्य कोठारांची निर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती, सुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन
२. पशु संवर्धन – पशुधनाची काळजी, संकरीत गुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे
३. समाजकल्याण – दारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/बालकल्याणाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे.
४. शिक्षण – प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक विकास
५. आरोग्य – सार्वजनिक विहीर, गटारे आणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय योजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा
६. रस्ते बांधणी – रस्ते, पूल, साकव यांची बांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, सचिवालय बंधने
७. ग्रामोद्योग आणि सहकार – स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी संस्था/पतपेढ्या स्थापणे
८. प्रशासन – महसुलाची कागदपत्रे अद्ययावत करणे, सार्वजनिक मालमत्तेची नोंद ठेवणे, घरांची नोंद ठेवणे, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे, बक्षिसांची नोंद, अतिक्रमणे हटविणे
आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.

* गाव नमुना नंबर – 1 – या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.

* गाव नमुना नंबर – 1अ – या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.

* गाव नमुना नंबर – 1ब – या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर – 1क – या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.

* गाव नमुना नंबर – 1ड – या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर – 1इ – या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर – 2 – या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर – 3 – या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.

* गाव नमुना नंबर – 4 – या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर – 5 – या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.

Source:
Bhajicart

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »