Agricultural News : शेतकऱ्याने टोमॅटोच्या उभ्या पिकात सोडल्या मेंढ्या, दोन एकर क्षेत्रावर

0
Agricultural News : शेतकऱ्याने टोमॅटोच्या उभ्या पिकात सोडल्या मेंढ्या, दोन एकर क्षेत्रावर
tomato crop : टोमॅटोला मातीमोल दर मिळत असल्याने खामखेडा येथील शेतकऱ्याने टोमॅटोच्या उभ्या पिकात मेंढ्या सोडल्या आहेत. अवकाळी पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या पिकाला भाव मिळत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे

नाशिक : नाशिक (nashik) जिल्ह्यातील खामखेडा (jamkheda) येथील शेतकरी समाधान आहेर यांनी दोन एकरमध्ये दोन लाख रुपये खर्च करून टोमॅटोची लागवड (tomato crop) केली होती. मात्र सुरुवातीला दीडशे रुपयेपर्यंत बाजारभाव मिळाला. पाहिल्या दुसऱ्या तोड्यालाच चाळीस ते पन्नास रुपये बाजार भाव मिळू लागल्याने उद्विग्न होत आहेर यांनी टोमॅटो पिकात मेंढ्या तसेच जनावरांना चारावयास सोडून दिले. वाढत्या तापमानामुळे फळे लवकर परिपक्व होत असल्याने आवक वाढत आहे. मागणी कमी व परराज्यातील व्यापारी कमी असल्याने बाजारभाव गडगडल्याने टोमॅटो तोडून विकण्यासाठी देखील घरातून पैसा जात असल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे. समाधान आहेर यांनी आज आपल्या दोन एकर क्षेत्रावर टोमॅटो खाण्यासाठी मेंढ्या सोडल्या आहेत. कांद्यानंतर आता टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. टोमॅटोला सध्या मातीमोल दर मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय. तोडणी केलेला माल बाजारात घेऊन जाण्यासाठी सुद्धा परवडत नसल्याने शेतकऱ्याने उद्विग्न होऊन टोमॅटोच्या उभ्या पिकात मेंढ्या चरायला सोडल्या आहेत.

धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »