Cotton Market : परभणीत कापूसदर हमीभावापेक्षा कमी

0

Cotton Market : परभणीत कापूसदर हमीभावापेक्षा कमी

Cotton Rate : गतवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्यात दर वाढतील या आशेने अद्याप कापूस विक्री न केलेल्या शेतकऱ्यांना जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे.

Cotton Market Update : जिल्ह्यातील कापूस खरेदीचे दर गेल्या दोन दिवसांत आणखी कोसळले आहेत. सेलू, मानवत या कापसाच्या प्रमुख बाजारापेठांमध्ये कापसाचे किमान दर हमीभावापेक्षा कमी झाले आहेत.

सेलू बाजार समितीत शुक्रवारी (ता. २६) कापसाला प्रतिक्विंटल किमान ५९०० ते कमाल ६८९५ रुपये तर सरासरी ६८३० रुपये दर मिळाले. गतवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्यात दर वाढतील या आशेने अद्याप कापूस विक्री न केलेल्या शेतकऱ्यांना जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे.
केंद्र सरकारने २०२२-२३ या वर्षासाठी मध्यम धाग्याच्या कापसाला प्रतिक्विंटल ६०८० रुपये तर लांब धाग्याच्या कापसाला प्रतिक्विंटल ६३८० रुपये एवढी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) जाहीर केली आहे.
परभणी जिल्ह्यातील सेलू, मानवत येथील बाजार समित्यांमध्ये गेल्या दोन दिवसांत कापसाचे किमान दर प्रतिक्विंटल साडेपाच हजार रुपयांहून तर कमाल सात हजार रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. सेलू बाजार समितीत गुरुवारी (ता. २५) कापसाला प्रतिक्विंटल किमान ५४०० ते कमाल ६८०५ रुपये तर सरासरी ६७४० रुपये दर मिळाले.
बुधवारी (ता. २४) कापसाची ३२४७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्वंटल किमान ६००० ते कमाल ७०८५ रुपये तर सरासरी ७०३० रुपये दर मिळाले. मानवत बाजार समितीत गुरुवारी (ता. २५) कापसाला प्रतिक्विंटल किमान ५३०० ते कमाल ६८३५ रुपये तर सरासरी ६७०० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २४) कापसाची ४०५२ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ५५०० ते कमाल ६९५० रुपये तर सरासरी ६८५० रुपये दर मिळाले.
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »