Micro Food Processing Scheme : सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून सात हजार शेतकऱ्यांना कर्ज

0

Micro Food Processing Scheme : सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून सात हजार शेतकऱ्यांना कर्ज

वर्षभरात ३५ हजार ८६८ शेतकऱ्यांचे अर्ज; लाभार्थ्यांना ३५ टक्के अनुदान
नगर : कृषी विभागामार्फत आत्मनिर्भर पॅकेजअंतर्गत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (Pradhan Mantri Micro Food Processing Industries Scheme) योजनेच्या लाभासाठी राज्यातील सुमारे ७ हजार २५८ शेतकऱ्यांना या योजनेतून कर्ज मंजूर केले आहे.
त्यातून सहा हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना कर्जाचे वितरणही केले आहे. प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी राज्यातून आतापर्यंत वर्षभरात ३५ हजार ८६८ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.
ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगार तरुण, शेतकरी, महिलांसाठी फळ पिके, कोरडवाहू पिके, भाजीपाला, अन्नधान्ये, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, मसाला पिके इत्यादींवर आधारित उत्पादने, दुग्ध व पशू उत्पादने, सागरी उत्पादने, मांस उत्पादने, वन उत्पादने इत्यादी प्रक्रिया उद्योगासाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू केली आहे.
ग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील शेतकरी उत्पादक गट, कंपनी, संस्था, जवळ शीतगृहाची उभारणी करणे ‘एक जिल्हा एक उत्पादन’ धोरणानुसार उत्पादनाच्या प्रक्रियेसाठी सामायिक प्रक्रिया सुविधा उपलब्ध करणे आदी बाबींचा समावेश आहे.
या योजनेच्या यशस्वितेसाठी तालुका स्तरावर जिल्हा संसाधन व्यक्ती नियुक्त आहेत. ते प्राप्त अर्जावर मोफत कारवाई करतात. या योजनेतून लाभ मिळावा यासाठी ३५ हजार ८६८ अर्ज आलेले आहेत.
त्यातील ११ हजार ४९९ अर्ज अर्धवट आहेत. २४ हजार ३६८ अर्ज कृषी विभागाकडे (Department of Agriculture ) असून त्यातील १५६५ अर्जात त्रुटी आढळल्या आहेत. ५ हजार ४६२ कर्जप्रस्ताव बॅंकाकडे असून ७ हजार २५८ शेतकरी, संस्थांना कर्ज मंजूर झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात २९६०, नगर जिल्ह्यात २२५८ अर्ज दाखल आहेत. सोलापुर, औरंगाबादमधूनही बऱ्यापैकी अर्ज आहेत. औरंगाबाद, पुणे, नाशिक, नगरमध्ये बऱ्यापैकी शेतकरी, संस्थांना प्रक्रिया उद्योगासाठी कर्ज मंजूर झाले आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »