उसवाड येथील एका महिलेचा वीज पडून मृत्यू

0

उसवाड येथील एका महिलेचा वीज पडून मृत्यू
काजी सांगवी (वार्ताहर भरत मेचकुल)
आज दिनांक 29 रोजी मिनाबाई केरू बटाव वय ते ३४ या मजुरीने कांदे लागण करण्यासाठी एकनाथ भुराजी बटाव यांच्या शेतात मुलगा विशाल केदु बटाव यांच्यासोबत गेले होते सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पावसाचे वातावरण तयार झाल्याने संबंधित व्यक्ती मुलगा देत जाऊ हे घरी परतत होते घरी परतत असताना मीनाबाई केदू बटाव यांच्यावर वीज पडून सदर व्यक्ती ही जागेवर मृत्यू झाली या व्यक्तीच्या पश्चात पती केदु निवृत्ती बटाव, मुलगा विशाल केदु बटाव मुलगी माधुरी केदु बटाव असे कुटुंब असून सदर कुटुंबाची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची आहे हे कुटुंब मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते आणि मुलांनाही शिक्षणासाठी मोलमजुरी करून शिक्षणास मदत करते मुलांचे मायेचे छत्र हरवल्याने सदर मुले याप्रसंगी आईच्या नावाने मोठ्याने आक्रोश करत होते संपूर्ण कुटुंबावर व गावावर मोठ्या प्रमाणात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेची माहिती मिळताच चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी पंचनामा करण्याचे आदेशदिले. त्यांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन दिले.

मिनाबाई केदु बटाव यांचा मृत्यू हा एक दुर्दैवी प्रसंग आहे. वीज पडण्याची घटना ही एक गंभीर समस्या आहे. वीज पडण्याची घटना रोखण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

वीज पडण्याची घटना रोखण्यासाठी खबरदारी

  • वादळी वा-यासह पाऊस पडत असताना घराबाहेर पडणे टाळा.
  • घराच्या छतावर किंवा खुल्या जागेत उभे राहणे टाळा.
  • वीज तारांपासून दूर राहा.
  • वीज कोसळण्याची शक्यता असल्यास, घराच्या आत सुरक्षित जागी राहा.

मिनाबाई केदु बटाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »