ग्रामीण भागात वाळवण कुरडाई पापड वडे शेवया आदी प्रकारचे पदार्थ करण्याची लगबग सुरु….

0

दिघवद वार्ताहर (कैलास सोनवणे ) : चांदवड तालुक्यात ग्रामीण भागात मार्च महिन्यात शेती कामे संपत येते व महिलांना वाळवण कुरडाई पापड वडे शेवया आदी प्रकारचे पदार्थ करण्याची लगबग सुरु होते काही ठिकाणी लग्नासाठी कुरडया पापड वडे शेवया लागतात तर काही ठिकाणी आजी आजोबा यांच्या श्रद्धा नंतर वाळवण केले जाते त्यामुळे ग्रामीण भागात महिला एकत्र येऊन एकमेकांच्या मदतीने वाळवण करतात काही महिलांकडे वाळवण बनवण्याचे साहित्य सोरया घाटाचे पातेले घोटया वाळवण टाकण्यासाठी लागणारे गव्हाचे काढ व मोठी शेगडी आदी नसल्याने वाळवण विकत घेतली जाते काही गावांमध्ये महिला गटाचे वाळवण बनवुन विकले जाते ज्या महिला नोकरी किंवा व्यवसाय करतात ते सर्व प्रकारचे वाळवन विकत घेतात तर काही ठिकाणी वाळवणाचे सर्व प्रकारचे साहित्य देउन सर्व प्रकारचे पदार्थ बनवून घेतले जाते शहरात व मंगलकार्यलयात विवाहसोहळा साठी तशेंच ग्रामीण भागातील व्यवसायिक या वाळवणाची खरेदी विक्री ला पसंती देत आहेत तर रेस्टॉरंट व ढाब्यावर हि यांची रेलचेल दिसत आहे

https://youtube.com/watch?v=XhLM5hGr4a4%3Fsi%3D-IsacBK-c2aL20T3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »