मोठी बातमी : नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी; नाशिक, जळगावच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

0
Devendra Fadnvis

Devendra Fadnvis

KNN: वैनगंगा-नळगंगा पाठोपाठ आता नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला (Nar-Par-Girna Interlinking Project) राज्यपाल सी पी राधाकृष्णन (Governor C P Radhakrishnan) यांनी मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. नार-पार-गिरणा नदी खोर्‍यातून 10.64 टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे. यामुळे तब्बल 49 हजार 516 हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.  

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये म्हटलं आहे की, वैनगंगा-नळगंगा पाठोपाठ आता नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला सुद्धा राज्यपाल महोदयांनी मंजुरी दिली आहे. मी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा अतिशय मनापासून आभारी आहे. या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून 10.64 TMC पाणीवापर प्रस्तावित असून त्याचा लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील 49,516 हेक्टर क्षेत्राला होणार आहे. सुमारे 7015 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.

काय आहे नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प?

नार-पार या नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा तालुक्यांतील नद्यांचे वाया जाणारे पाणी गिरणा नदीत टाकण्याची ही योजना आहे. यासाठी साधारणपणे साडेसहा ते सात हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातून नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव या तालुक्यांना, तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, धरणगाव आदी तालुक्यांतील सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. धुळे जिल्ह्यातील काही भागांत याचा लाभ होणार आहे. यामुळे साधारत: अडीच लाख हेक्टर सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून 10.64 TMC पाणीवापर प्रस्तावित आहे. आता या योजनेला मंजूर मिळाल्याने उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »