मनमाड इंदूर नवीन रेल्वे मार्गामुळे नाशिक जिल्ह्याच्या कृषी व पर्यटनाला मिळणार चालना:डॉ. भारती पवार

0

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)मनमाड इंदूर नवीन रेल्वे मार्गामुळे नाशिक जिल्ह्याच्या कृषी व पर्यटनाला मिळणार चालना:डॉ. भारती पवार
मनमाड पासून मध्य प्रदेशातील इंदूर शहरापर्यंत ३०९ किलोमीटर लांबीचा नवा रेल्वे मार्ग बांधण्याचा निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिल्याने प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानते.
प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वात रेल्वे मार्ग विकसित करून अत्याधुनिक रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात येत असून नुकतीच यासाठी १८ हजार कोटींचा नवा रेल्वे मार्ग तयार होणार असल्याने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची खासदार असताना वेळोवेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मतदारसंघातील रेल्वे मार्ग सुखकर करण्यासाठी व विशेषतः मनमाड जंक्शन पासून इतर राज्यांमध्ये रेल्वे मार्ग जोडण्यासाठी मागणी केली होती त्याचे फलित म्हणून या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा तसेच यामधील सर्व महत्त्वाच्या जिल्ह्यांना रेल्वे मार्ग जोडला गेल्याने मोठी रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. तसेच कृषी व पर्यटन वाढीला देखील चालना मिळणार आहे. नव्या रेल्वे मार्गामुळे कृषी उत्पादने, कंटेनर,खते,लोह खनिज, सिमेंट, पेट्रोलियम, तेल इत्यादी वाहतूक सुलभ होणार असून मालवाहतूक देखील उपलब्ध होणार आहे. सदरचा रेल्वे मार्ग हा एकूण सहा जिल्ह्यांमधून जाणारा असून यामुळे प्रथमच मालेगाव शहर देखील रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. या लोहमार्गामुळे जवळपास 1000 पेक्षा जास्त गावे जोडले जाणार असून 30 नवीन रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहेत. मध्य प्रदेशातील बाजरी उत्पादक जिल्हे व महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांना दळणवळण यासाठी हा एक महत्त्वाचा रेल्वेमार्ग ठरणार असल्याची भावना यावेळी माझी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी व्यक्त केली.
आज दुरदृष्य प्रणालीद्वारे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार व्यक्त करतांना धुळे लोकसभा मतदारसंघाचे मा. खासदार सुभाष भामरे , नंदुरबार मा. खासदार डॅा. हिना गावीत व डॅा. भारती पवार या उपस्थित होत्या .

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »