चांदवड देवळा मतदारसंघात  प्रहारच्या ताकदीने निवडणूक लढू : आमदार बच्चू कडू

0

काजीसांगवी (दशरथ ठोंबरे):–गेला कित्येक वर्षापासून चांदवड देवळा मतदार संघाचे राजकारण पाण्याभोवती फिरते आहे पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी सत्याधारांमध्ये ताकद नाही जाती धर्माच्या नावाने राजकारण करून निवडणुका लढवल्या जातात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ची लढाई करून प्रहारच्या ताकतीने आगामी विधानसभा निवडणुकीत चांदवड देवळा मतदारसंघात गणेश निंबाळकर बॅटिंग करतील असे उद्गार प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी चांदवड येथील पत्रकार परिषदेत काढले. चांदवड येथील दिनांक 18 रोजी रंगमहाला च्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते .यावेळी प्रहारच्या जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर समाधान बागल आदी सह पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तिसरी आघाडी उभी करीत प्रस्थापित पक्षांना धक्का देण्याची तयारी चालवलेल्या बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधारी मंडळीवर निशाणा साधला वर्षानुवर्ष चांदवडचे राजकारण पाण्याभोवती होत आहे माझ्या मतदारसंघात अवघे तीन धरणे होते माझ्या कारकिर्दीत सहा नवीन धरणे बांधली पाणी प्रश्न कायमचा निकाली काढला यासाठी मानसिकता लागते प्रहार पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या लेकराला म्हणजेच गणेश निंबाळकर यांना चांदवड देवळा विधानसभेची उमेदवारी देत आहे निंबाळकर यांची नाळ नेहमी शेतकरयाच्या मातीशी जोडलेली आहे .शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे नेहमी धडपडत असतात गेल्या लोकसभा निवडणुकीत कांदा प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी निंबाळकर यांनी केंद्रीय मंत्री च्या घरावर आंदोलने केली याचाच फटका लोकसभा निवडणुकीत दिसून आला तसेच चांदवड देवळा तालुक्याचे कृषी क्षेत्राशी संबंधित प्रश्न गंभीर आहेत अधिकारी वर्ग खाजगी कंपन्यांना पूरक भूमिका घेतात त्यांना त्याचे पैसे मिळत असतील परंतु प्रहार अशा अधिकाऱ्यांना धडा शिकवीन असा दम ही त्यांनी पिक विमा गहीर प्रकारावरून अधिकाऱ्यांना दिला.

मा.आमदार बच्चू कडू

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »