तेरा वर्षाच्या ओमकारनी केली नर्मदा परिक्रमा

0

दिघवद (वार्ताहर कैलास सोनवणे).                    ‌ चांदवड तालुक्यातील बोपाने येथील तेरा वर्ष ओमकार शरद हांडगे याने नर्मदा परिक्रमा चे 55 दिवसात 3800 किलोमीटरचे खडतर अंतर सायकलवर मजल करीत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली ओमकारच्या जिद्दीला व त्याच्यात असलेल्या अध्यात्मिक शक्तीला खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळाली ती त्याच्या वडिलांकडून ओमकार चे वडील चांदवड येथील महावितरण कंपनीत कार्यरत आहेत त्यांनी 21 जानेवारी ते 26 एप्रिल ह्या कालावधीत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती ओमकार ने आपल्या वडिलांकडून सर्व आत्मसात केल्यावर नर्मदा परिक्रमा मलाही करायची अशी मनीषा बाळगली होती आणि त्याचे त्याने परिक्रमाचे स्वप्न सत्यात उतरवून सायकल वर एकट्याने 3800 किलोमीटरच्या अंतर आपल्याबरोबर बिछाना  व इतर साहित्य घेऊन 21 ऑक्टोबर 2022 रोजी नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी नर्मदे हर हर या घोषणेने परिक्रमेला सुरुवात केली होती त्याने अनेक अडचणी चा सामना करत गंधारण्यतून करण्यात आला आपली सायकल चोरीला गेली असतानाही न घाबरता संयमाने ही परिक्रमा 16 डिसेंबर 2022 रोजी पूर्ण केली आपल्या हांडगे परिवाराबरोबरच बोपाने गावाचा चांदवड तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव उज्वल केल्याबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदन होत आहे परिक्रमा केल्याबद्दल राम कृष्ण हरी साधना आश्रमाचे मुख्य मठाधिकारी ज्ञानेश्वर माऊली शिंदे रामायण चार भास्कर नाना रसाळ चांदवड वारकरी संप्रदायाचे बाळासाहेब कबाडे हरिभक्त परायण तुकाराम महाराज वाजे चंदूकाका आवारे शंकरराव कोल्हे भागवताचार्य सीमाताई राजेंद्र काळे वारकरी मंच प्रदेश कार्याध्यक्ष पत्रकार रामभाऊ आवारे दिगवत चे हरिभक्त परायण श्याम महाराज  गांगुर्डे अर्जुन महाराज गांगुर्डे प्राचार्य सीटी रोटे. संजय महाजन दुकळे  नवनाथ महाराज गांगुर्डे राजेंद्र काळे संजय ठाकरे वाळू हांडगेज्ञानेशरहांडगे   शिवाजी महाराज आहेर  बापाणे येथिल ग्रामस्थ   दिघवद व  जिल्हातिल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले आहेत

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »