कापूस लागवड व व्यवस्थापन🌱

0
kapashi

जमीन –

कापूस लागवडीसाठी काळी कसदार पाणी धरून ठेवणारी जमीन निवडावी.जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखरणीपूर्वी कोरडवाहू पिकासाठी एकरी ३ टन तसेच बागायती लागवडीसाठी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात सम प्रमाणात पसरावे. गांडूळ खत उपलब्ध असल्यास प्रति एकरी १ टन शेणखत/ कंपोस्ट खतासोबत मिसळून द्यावे.

लागवड –

कापसाची लागवड ही शक्यतो १५ ते ३० जून दरम्यान करावी .७५ ते १०० मी.मी. पाऊस झाल्यावर करणे योग्य असते.

कापसाचे वाण

बीटी कपाशी वाणांची लागवड वातावरणाचे तापमान ३५ डि.से.पेक्षा कमी झाल्यावरच (२५ मे नंतर) करावी.तसेच कपाशीची लागवड जमीन ओलावून वापशावर करावी.राशी ६५९ (राशी सीड्स), कब्बडी (तुलसी सीड्स), सुपरकोट (प्रभात सीड्स) आणि यु.एस. ७०६७ ( यु.एस. ऍग्रीसीड्स). वाणाचे एकरी ८००-९०० ग्रॅम बियाणे लागते.कापूस पेरणी करत असताना बीजप्रक्रिया करणे महत्वाचे आहे.

खत व पाणी व्यवस्थापन

संकरित वाण (प्रति एकर) – खतांची मात्रा – प्रति एकर ३२ किलो नत्र, २० किलो स्फुरद व २० किलो पालाश द्यावे.

लागवड करतेवेळी – युरिया – २५ किलो, डी ए पी – ५० किलो, म्यूरेट ऑफ़ पोटॅश – ५० किलो + नीम केक १०० किलो + मायक्रोनुट्रीएंट खत १० किलो + मॅग्नेशियम सल्फेट १० किलो + बोरॉन १ किलो मिसळून द्यावे.

लागवडीनंतर ३० दिवसांनी
युरिया- २० किलो + १०:२६:२६ – २५ किलो +

लागवडीनंतर ४५ दिवसांनी
युरिया- १५ किलो + १०:२६:२६ – २५ किलो

खते देताना मातीपरीक्षांनुसार दिल्यास उत्पादनामध्ये वाढ व खर्चामध्ये बचत होईल.
पाटपाण्याने पाणी देताना १० – १२ दिवसांच्या अंतराने द्यावे (पावसावर अवलंबून)
फुले उमलणे, बोंडे धरणे व भरणे या महत्त्वाच्या अवस्था असून या अवस्थांच्या काळात वेळच्या वेळी देणे जरुरीचे आहे.

वेचणी व उत्पादन

लागवडीनंतर १३० ते १८० दिवसांनी कापसाची वेचणी होते. शेतातील अंदाजे ३० ते ३५ टक्के बोंडे फुटल्यावर पहिली वेचणी करावी, त्यानंतर साधारणपणे १५ ते २० दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेचण्या कराव्यात.वेचल्यानंतर कापूस ३-४ दिवस उन्हात वाळवून स्वच्छ व कोरड्या जागी साठवावा.संपूर्ण उत्पादन १२ – १५ क्विंटल प्रति एकर मिळाते.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »