Girna Dam : गिरणा धरण फुल्ल,पुराचा धोका,नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्कतेचा इशारा..

0

गिरणा धरणाचा पाणीसाठा मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत वाढून 87.45% वर आला असून गिरणा धरण 100% भरण्याच्या मार्गावर आहे.कोणत्याही क्षणी पाण्यातून विसर्ग सुरु करण्याची शक्यता आहे. गिरणा धरणात 35 ते 40 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.धरण 100% भरू शकण्याची शक्यता आहे.खान्देश आणि आसपासच्या भागाला पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

गिरणा नदीच्या काठच्या गावांना नदीपात्रात पाणी सोडण्यापूर्वी पूर्वसूचना देण्यात याव्या.सतर्कतेचा इशारा देण्यात यावा, असे पत्र कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभागाने दिले आहे.चांगल्या पावसामुळे गिरणा धरण भरल्याने जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्याची शक्यता आहे.धरण भरल्याने खान्देश प्रदेशात शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन सुधारेल.धरण भरल्यामुळे नदीकाठच्या गावांना पूर येण्याचा धोका असतो. इतके मोठे प्रमाणात पाणी उपलब्ध असताना त्याचे योग्य व्यवस्थापन करणे ही एक मोठी चुनौती आहे.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »