त्रिशताब्दी वर्षपुर्ती निमित्त नासिक मध्ये साकारला चोंडी येथील अहिल्यासृष्टी देखावा

0

वार्ताहर(कैलास सोनवणे): राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या सव्वा द्विशतकी वर्षपुर्ती (२२९) आणि त्रिशताब्दी वर्षे पूर्तीचे (३००)औचिक्य साधत समाज भुषण श्री शिवाजी ढगे चि अथर्व ढगे पत्नी सुनिता ढगे आणि परीवार यांनी अथक परिश्रमाने मातोश्री ना मानवंदना म्हणून जन्मस्थळ श्रीक्षेत्र चौढी ता.जामखेड जि.अहिल्यानगर येथिल भव्य आठ फुट लांब बाय दहाफुट ऊंची आणि तिनं फुट रंदी आशा राजमहाल स्मारकाची प्रतिकृती श्रीगणेशा स्थापणा प्रित्यर्थ आपल्या रहात्या घरी (*दगाई निवास ओम अपार्टमेंट, रेणुका माता चौक, अशोक नगर,सातपुर, नाशिक साकरली आहे …
खरं तर चौदा पंधरा राजे मल्हारराव होळकरां पासुन ते उषाराजे होळकर यांच्या पर्यंत होऊन गेलेत. जवळपास अडिचशे वर्ष राज्यकारभार ह्या  हिंदुस्थान च्या भुमिवर उभारुन आपल्या पराक्रमाच्या भगव्या पताका कटक ते अटक पर्यंत फडकवल्यात आपला पराक्रम गाजावलात.
    .उपेक्षित वर्गातील ऐतिहासिक वारसा जगाच्या पटलावर आनण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित होउन ह्या महारांजांच्या इतिहासाची ऊजाळणी होण्याकाही हा उहपोह.. ह्या धरतिवर पराक्रमी पुरुषाच्या बरोबरीने पराक्रमी महीलाही होऊन गेल्यात आगदी माँसाहेब जिजाऊ माँ साहेब रमाबाई माँ साहेब सावित्रीबाई माँ साहेब अहिल्याबाई माँ ताराराणी झाशिची राणी , माँसाहेब फातिमा शेख यापासुन ते माँ साहेब इंदिरा गांधी,प्रतिभाताई पाटिल ते महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा पराक्रम गाजावलात आणि आणि त्या ह्या उच्य स्थानावर पोहोचल्यात, त्यातिलच एक….
*पुण्यश्लोक महाराणी देवी अहिल्याबाई होळकर होय.* अहिल्याबाई यांचा जन्म आपल्या महाराष्ट्रातील तत्कालीन अहमदनगर आणि आताचे महाराष्ट्र सरकारने तिनशेव्या जन्मोत्सव निमित्तानं माँ साहेब अहिल्या यांना मानवंदना म्हणून केलंल नामकर जिल्हा अहिल्या नगर…या जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील कर्जत जामखेड रस्त्यावर कर्जत पासुन जामखेड जाताना २०/२५ किलो अंतरावर एक छोटंसं चौंडी नामक गाव आहे तेथे तत्त्कालिन पंचक्रोशीतील कारभार सांभाळणारे *शिंदे पाटिल घराण्यातिल मानकोजी शिंदे आणि आई सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी ३१ मे १७२५ रोजी कन्या रत्न जन्माला आले.* त्याचे नाव पुढे जगभर अजारामर ठरले.पुर्ण जगाला हेवा वाटावा आसा आदर्श राज्य कारभार जवळपास तिस वर्षे हिंदुस्थान च्या भुमिवर गाजवला.त्या माय माऊली चे त्रिशताब्दी वर्षे म्हणून या वर्षी साजरे होत आहे…


  आज मितिला चौकाचौकात होणारे देखावे डेकोरेशन प्रतिकृती घराघरात हि साकारण्याची कला हल्ली च्या तरुणांमध्ये अवगत रुजु लागली त्याचिच हि परिनितीच्या च्या निमित्तानं हि संकल्पना सुचली आणि आमलात आनली तिला *होळकर घराण्याचे वंशज रिचर्ड शिवाजी राजे होळकर अमेरिका , जहांगीर अमरजित दादा बारगळ तळोदा संस्थान, माँ खासदार पद्मश्री डॉ महात्मे नागपूर, थोर इतिहास संशोधक साहित्यिक मा बापुसाहेब हटकर (युएसए) ,, नानासाहेब होळकर मुंकुदराजे होळकर (वंशज नाशिक) इतिहास संशोधक प्रा राम लांडे (जालना),जाँनपाँवर इंड्स्डीचे संस्थापक मा चंद्रकांत जानराव (उद्योजक संभाजी नगर) विनायक काळदाते, समाधान बागल सामाजिक कार्यकर्ते प्रहार जिल्हा सरचिटणीस ,दत्तु बोडके उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख , श्याम गोसावी शहर प्रमुख  (प्रहार टिम)रतन सांगळे, (भटके विमुक्त आघाडी) समाधान देवरे (रायगड प्रतिष्ठान)यांच्या सह नाशिक पंचक्रोशीतील राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कामगार क्षेत्रातील हजारो शुभचिंतकांनी अभिंनदनाचा वर्षाव केला...गणेशोत्सव आरास माध्यमातून श्रीक्षेत्र नाशिक पंचक्रोशीतील गणेश भक्तांना अहिल्या प्रेमिणा ह्या माध्यमातून ऐतिहासिक आठवणीना उजाळा…देत…….. दर्शन… यापुढे असे देखावे तरुणांनी महाराष्ट्रातील हिंदू समाजाने तयार करून समाजापुढे आणावे आपल्या कलाकृतीचा अनुभव सर्व समाजाला द्यावा.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »