हिवरखेडे येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

0

काजीसांगवी (उत्तम आवारे):जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरखेडे येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सदस्य श्री पिंटू भोईटे यांनी स्वीकारले . श्री दौलत आरण यांनी सपत्नीक अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले तर लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन श्री सुनील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले .
शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकत मराठी इंग्रजी व हिंदी भाषेत भाषण सादर केली
सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री . दौलत आरण (चांदवड तालुका मातंग समाज समन्वय समितीचे अध्यक्ष ) यांच्यावतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही व पेन या स्वरूपात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री राजाराम गुंजाळ , श्रीम् कमल सूर्यवंशी ,श्री निलेश हिरे, श्रीम संध्या देवरे, श्रीम जयश्री पाटील यांनी परिश्रम घेतले .
सदर कार्यक्रमासाठी पोलीस पाटील सौ. अनिता जाधव, श्री सुनील शिंदे ( जि.प. शाळा माजी अध्यक्ष ) श्री शांताराम शिंदे ,श्री बाळासाहेब शिंदे, श्री दत्तू , श्री किरण शिंदे , हरि चंद्र शिंदे , सागर हांडगे उपस्थित होते .

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »