सकल मराठा परीवार तर्फे”एक राखी सैनिकांसाठी” उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा

0

सकल मराठा परीवार तर्फे”एक राखी सैनिकांसाठी” उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा
————————————————————
काजीसांगवीः( उत्तम आवारे ) — सकल मराठा परिवार नाशिक यांच्या वतीने व मराठा विद्या प्रसारक समाजाचे अभिनव बाल विकास मंदिर मखमलाबाद, पेठे विद्यालय सिडको , जनता विद्यालय गांधीनगर, मनपा शाळा ४९ या ठिकाणीं “एक राखी सैनिकांसाठी” हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.समन्वयक खंडू आहेर यांनी या उपक्रमाविषयी सखोल माहिती दिली.आपण सैनिकांपर्यंत पोहचू शकत नाही.जे सैनिक देशाचे रक्षण करतात अशा सैनिकांना आपण राखी व भेटकार्ड पाठविल्यामुळे त्यांचा आनंद द्वीगुणीत होणार आहे.तसेच जे बांधव दिवसरात्र सीमेवर सेवा करत आपल्या साठी उभे असता त्यांच्यामुळे आपले सण ,उत्सव जोराने साजरे होतात पण त्यांना त्यात सहभागी होता येत नाही तर आपल्या समाजचे त्यांच्या प्रती काही देणे लागते म्हणून सकल मराठा महिला परिवरच्या वतीने दरवर्षी हा रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम राबवला जातो .

यावेळी 20 ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात राखी,ग्रिटिंग व मेसेज कार्ड पाठवण्यात येत आहे.ज्यावेळी या राख्या सीमेवर सैनिक बांधव याना भेटतात तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावत नाही तसेच त्यांच्या कडून ग्रूप च्या बहिणी याना आभार पत्र पण येते.या उपक्रमासाठी इ.१ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी तसेच महिला शिक्षिकांनी सुध्दा अतिशय सुंदर राख्या व आकर्षक भेटकार्ड बनविले होते.या भेटकार्डांवर अतिशय समर्पक असे घोषवाक्य लिहीलेली होती.सैनिकहो तुमच्यासाठी,,,,,,अशा भारवलेल्या भावनांनी सीमेवर तैनात असणार्‍या सैनिकांसाठी राखी पाठविण्याच्या कार्यात दरवर्षी अग्रेसर असते.हा उपक्रम हा संपूर्ण महाराष्ट्र तून केला जातो. या उपक्रमास मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे, एल डी आवारे सर श्रीमती सोनल वाघ श्रीमती ज्योती काळोखे यांचे सहकार्य लाभले यावेळी सकल मराठा परिवाराचे समन्वयक , चैताली आहेर,सविता पवार,अपूर्वा पाटील,सुरेखा जाधव,जयश्री पवार,छाया फलाने,आरती दुशिंग , शीतल आहेर,चेतन लोखंडे, दत्ता काळे, प्रकाश बोराडे,आनंद पाटील,तसेच संपूर्ण सकल मराठा परीवार टीम उपस्थित होती

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »