ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन ; गावाकडे जाण्यासाठी बस डेपोत,कोणत्या एसटी बस सेवा ठप्प ?

0

गणेशोत्सव साजरा होत असतानाच, एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कामगार संयुक्त कृती समितीच्या आवाहनानुसार, कालपासून त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यामुळे सर्व एसटी बस डेपोमध्ये बस थांबल्या आहेत आणि प्रवाशांना मोठी अडचण येत आहे. या आंदोलनामुळे राज्यभरातील एसटी सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. मुंबई सेंटर येथील एसटी बस डेपोमध्ये या आंदोलनाचा थेट परिणाम दिसून येत आहे.

गणेशोत्सवाच्या उत्साहात गावी जाण्याची धावपळ असताना, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे हजारो प्रवासी अडचणीत सापडले आहेत. अनेकांनी आधीच एसटीची तिकीटे बुक केली होती, तरीही त्यांना प्रवास करण्याची संधी मिळत नाहीये. मुंबई सारख्या महानगरात तर प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. दोन महिने अगोदर बुक केलेली बसही वेळेवर सुटत नाहीये, हे पाहून प्रवासी सरकार आणि प्रशासनावर खासगी वाहतुकीच्या भरोसे राहण्याची वेळ आली आहे, अशी खंत व्यक्त करत आहेत. पुणे आणि रायगड जिल्ह्यातही हीच स्थिती आहे, परंतु रायगडमध्ये मात्र आंदोलनाला उदासीन प्रतिसाद मिळत आहे.अकोल्यात मात्र परिस्थिती भिन्न आहे. येथील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत सर्व बससेवा ठप्प केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी गेल्या काही काळापासून असंतुष्ट आहेत. त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांसारखे वेतनमान आणि 2018 पासून थकलेला महागाई भत्ता मिळावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनांनी ऐन गणेशोत्सवाच्या वेळी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाखो प्रवासी गणेशोत्सवाच्या काळात आपल्या गावी जाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सर्वच एसटी कामगार संघटना एकत्र येऊन या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. जर लवकरच या प्रश्नाचे निराकरण झाले नाही, तर राज्यातील परिवहन व्यवस्था पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »