पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव समिती मार्फत
श्रीमंत सुभेदार मल्हार होळकर यांचा अश्वरूड स्मारक मागणी..
श्री समाधान बागल
काजीसांगवीः उत्तम आवारे : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक आयोजित श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळा ची ध्वजारोहण करून तसेच नर्मदा गोदावरी च्या जलाने जलाभिषेक करण्यात आला.अटकेपार झेंडे लावणारे सुभेदार मल्हारराव होळकर यांना मोगलांकडून चांदवडची देशमुख देण्यात आली आणि चांदवड हे होळकरांचे चांदवड झाली एकेकाळी या चांदवडचा दुग्ध व्यवसाय विणकर तेल व्यवसाय आणि त्याचबरोबर चांदवाडी पेढा चांदवाडी बूट अशा एकना अनेक उद्योगांसाठी प्रसिद्ध असणार हे चांदवड मल्हारराव होळकर यांच्या ताब्यात आल्याने ते अधिक अधिक नावारूपास आले आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांनी व त्यांच्या सुनबाई पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी चांदवड शहरावर भरभरून प्रेम केले आणि म्हणूनच चांदवड शहर हे भारतभर होळकरांची इंदूर नंतर दुसरी उपराजधानी म्हणून नावा रुपास आले आणि ह्याच कारणामुळे चांदवड चा रंग महाल चांदवड मध्ये असणारी होळकरांची टंकसाळ आणि ह्या टंक शाळेतून तयार होणाऱ्या नाण्यांच्या गुणवत्तेच्या आधारे समाजात प्रचलित झालेली चांदवाडी रुपया नावाची म्हण या सर्वच गोष्टी नावाला आल्या आणि असे हे होळकरांचे कार्यक्षेत्र असणार चांदवड शहर या ठिकाणी मल्हारराव होळकर यांच्या इच्छेप्रमाणे अहिल्यादेवी होळकर यांचे कार्यकाळात सुंदर अशा रंगमहालाची निर्मिती झाली आणि ह्याच रंगमहालाच्या नावाने आज चांदवड नगरी प्रसिद्ध आहे होळकरांचे हे कर्तुत्व व मल्हारराव होळकर यांचे मराठा इतिहासातील योगदान अहिल्यादेवी होळकर यांचे शासन पद्धती समाज उपयोगी कार्य धर्म रक्षण व धर्म उपयोगी कार्य या सर्वांची आठवण म्हणून हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक यांचे वतीने सालाबादप्रमाणे चांदवडच्या रंगमहालामध्ये 16 मार्च रोजी सुभेदार मल्हारराव होळकर यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला समितीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमांमध्ये होळकर राजघराण्याचे वंशज सदस्य श्री मुकुंदराजे होळकर यांचे असते होळकरांचा बांडा ध्वज रंगमहालावर फडकवून होळकरांचा मराठा साम्राज्य व भारतभूमीसाठी ह्याच ध्वजाखाली लढून दिलेल्या बलिदान व शौर्यास वंदन केले यानंतर माननीय श्री मच्छिंद्र जी बिडगर यांचे हस्ते सपत्तीक सुभेदार मल्हारराव होळकर यांची प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या विषयी माहिती सांगून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांचे आज पर्यंत अश्वारूढ स्मारक चांदवड नगरीत का झाले नाही याबद्दल उपस्थितांनी खेद व्यक्त केला आणि चांदवड नगरीमध्ये सुभेदार मल्हारराव होळकर यांचे अश्वारूढ स्मारक व्हावे यासाठी हिंदूधर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक यांचे संस्थापक अध्यक्ष समाधान बागल, मुकुंदराजे होळकर, मच्छिंद्र बिडगर तसेच होळकरांचे खाजगी ट्रस्टचे सदस्य व उपस्थित जनसमुदायाने मल्हारराव होळकर यांच्या नावाने घोषणा देऊन चांदवड नगरीत अश्वारूढ पुतळा असावा अशी मागणी केलेली आहे याआधीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा मुद्दा चांदवडच्या राजकारणात व सांस्कृतिक वातावरणात गाजलेला आहे आणि त्याचबरोबर आता मल्हारराव होळकर यांचे स्मारक व्हायला हवे यासाठी परत एकदा चांदवडवासीय व समिती आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे
श्री समाधान बागल
मल्हारराव होळकर यांचे योगदान हे सबंध भारत वर्षासाठी असून दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले हे वाक्य बोलण्यासाठी मूळ कर्तुत्ववान पुरुषांमध्ये पहिलं नाव मल्हारराव होळकरांचे घ्यावे लागेल आणि म्हणून अशा महापुरुषांचे स्मारक हे चांदवड नगरीच्या ऐतिहासिक सांस्कृतिक व भौगोलिक परिस्थितीला साजेस असेल आणि म्हणून सुभेदार मल्हारराव होळकर यांचे अश्वारूढ स्मारक चांदवड नगरीत व्हायलाच हवे अशी सर्वानुमते मागणी करण्यात आली. यानंतर उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करून मान्यवरांच्या हस्ते सभेस मार्गदर्शन करून जन्मोत्सव सोहळा पार पडला.
याप्रसंगी मुकुंद राजे होळकर होळकर घराणे वंशज मच्छिंद्र भाऊ बिडकर समाजसेवक,सुभाष पवारहोळकर ट्रस्ट मॅनेजर, श्याम गोसावी प्रहार जिल्हाप्रमुख, समाधान बागल, समाजसेवक,दुर्गेश होळकर,,बाळासाहेब सोनवणे,दत्तात्रय बारगळ सर,ज्ञानेश्वर ढेपले विनायक जी काळदाते,, पिंटू गाढे
वैभव रोकडे,भूषण जाधव,कल्पेश शिंदे, अमोल गजभार, तसेचसमाज बांधव उपस्थित होते.


