दुध उत्पादक शेतकऱ्यांना सरकार देणार अनुदान,जाणून घ्या काय आहे योजना?
दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकार प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रुपयांच्या सबसिडीसोबत ३२ रुपयांचा दर मिळणार आहे.राज्याच्या दूध दराच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि.४ [...]