मनमाडमधील युनियन बँकेतील विमा प्रतिनिधीने ठेवीदारांना करोडो रुपयांचा गंडा घातला!
मनमाडमधील युनियन बँकेतील एका विमा प्रतिनिधीने शेकडो मुदत ठेवीदारांना फसवून करोडो रुपयांचा अपहार केला आहे.आरोपी विमा प्रतिनिधीने बँकेच्या मुदत ठेवी आणि नूतनीकरणासाठी दिलेले चेक स्वतःच्या नावावर वटवून पैसे अपहृत केले.या प्रकरणामुळे संतप्त ठेवीदारांनी बँकेसमोर आंदोलन केले आहे.बँकेने चौकशी पथक नेमून गैरव्यवहाराची चौकशी सुरू केली असून, ठेवीदारांना पैसे परत देण्याची हमी [...]