Onion Market : या जिल्ह्यांत रब्बीची सरासरीपेक्षा जास्त पेरणी, नवीन खरीप कांद्याची आवक वाढली
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपासून राज्यातील उन्हाळ कांद्याची आवक संपली असून, नव्या खरीप लाल कांद्याच्या आवकेत सुधारणा झाली आहे. देशांतर्गत मागणी व निर्यातीच्या स्थिरतेमुळे कांद्याचे दर सध्या स्थिर आहेत. विशेषतः नाशिक, नगर, आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये खरीप लाल कांद्याची आवक मुख्यत्वे पाहायला मिळते. मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका ऑक्टोबर महिन्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे खरीप कांद्याचे [...]