EPFO News: खुशखबर! खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी पगारात होणार 6 हजारांनी वाढ?
खासगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) लवकरच खासगी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढवण्याच्या तयारीत आहे. हा निर्णय खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. याबाबतची फाईल जवळपास तयार झाली असल्याचे सांगण्यात आले असून, फाईल मंजूर झाल्यास कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. [...]